शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

‘एकट्या’ कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना पेन्शन

By admin | Published: January 28, 2015 4:48 AM

राज्यातील एकट्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना आता पेन्शनचा लाभ घेता येणार आहे़

नारायण जाधव, ठाणेराज्यातील एकट्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना आता पेन्शनचा लाभ घेता येणार आहे़ याबाबतचा निर्णय सरकारने गेल्या आठवड्यात घेतला असून तो ज्यांना शासनाची पेन्शन योजना लागू आहे त्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आणि जिल्हा परिषदांतील ‘एकट्या’ शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना हा निर्णय गुरुवारपासून लागू करण्यात आला आहे़ज्यांच्या पश्चात पत्नी किंवा पतीसह मुले हयात नाहीत, आईवडिलांचा सांभाळ करायला त्याच्याशिवाय दुसरे कुणी नाही, किंवा ज्यांचे दुसरे कोणते उत्पन्नाचे साधन नाहीे, अशा कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे़ मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना शासनास विहीत नमुन्यात शपथपत्राद्वारे आपल्या पालकांच्या नावांची घोषणा केलेली असावी़ ही अट नियतमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्तीवेतनास पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू आहे़ तरच त्याच्या पालकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे़ मात्र, ज्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असेल किंवा विनापरवानगी अनुपस्थितीच्या काळात त्याचा मृत्यू झाला असेल, अशा कर्मचाऱ्यांच्या पालकांना ही योजना लागू राहणार नाही, असे वित्त विभागाने बजावले आहे़