Chhagan Bhujbal: लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 02:36 PM2023-07-05T14:36:34+5:302023-07-05T14:36:57+5:30

Chhagan Bhujbal: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी बंडाचा झेंडा खांड्यावर घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.

People are asking why Sharad Pawar's photo has been put up? Chhagan Bhujbal spoke clearly, said... | Chhagan Bhujbal: लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले...

Chhagan Bhujbal: लोक विचारताहेत शरद पवारांचा फोटो का लावलाय? छगन भुजबळ स्पष्टच बोलले, म्हणाले...

googlenewsNext

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी बंडाचा झेंडा खांड्यावर घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर गेल्या चार दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. एमईटी इन्स्टिट्युट येथे सुरू असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं. तसेच शरद पवारांचा फोटो का लावताय, म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांना खरमरीत उत्तर दिलं आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, घडलेल्या घटनाक्रमामुळे शरद पवार साहेबांना वाईट वाटण स्वाभाविक आहे. वळसे पाटील वगैरे सहकारी सोडून गेल्यानंतर पाणी तरळणं स्वाभाविक आहे. आता लोक विचारतात की शरद पवार यांनी मनाई केल्यानंतरही त्यां फोटो का लावला. त्याचं कारण म्हणजे शरद पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरलं आहे. साहेब या बडव्यांना बाजूला करा, आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या, अशी विनंती. साहेब आमचे विठ्ठल त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. 

Web Title: People are asking why Sharad Pawar's photo has been put up? Chhagan Bhujbal spoke clearly, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.