शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

By admin | Published: July 21, 2016 5:44 AM

मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे.

मुंबई : ‘मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे. खालपासून वरपर्यंत त्यांना बरीच माहिती आहे,’ असा टोला लगावत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या तासभराच्या भाषणात विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी करत, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा इशारा द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि खुनाच्या घटनेसंदर्भात विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी कोपर्डीला घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. नागपुरात ११५ गोवारी मृत्युमुखी पडले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तेथे गेले नाहीत, म्हणून ते असंवेदनशील होते, असा आरोप करणे योग्य होणार नाही. राजकीय भाषण मला देता येत नाही, पण झालेल्या आरोपांना उत्तर दिले नसते, तर लोकांना ते खरे वाटले असते. कोपर्डी प्रकरणावरून राज्यात दुफळी माजण्याची शक्यता असताना विधिमंडळाच्या दोन्ही सदनातून राज्याला एकमताने संदेश द्यायला हवा. राज्य पिडीतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. नराधमांना फाशी होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात तीन ह्यसीएमह्ण नाहीत, मी एकच आहे आणि सक्षम आहे. तीन ह्यसीएमह्णची सवय तुम्हाला असेल. तुमच्यासारखा एक रवी इकडे आणि एक रवी तिकडे अशी गरज मला नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना हाणला. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. पण ईडी आणि सीआयडीच्या कारवाईला राणेंसारख्या सज्जन, सत्शील माणसाने का घाबरावे? असा तिरकस सवालही केला. भाजपाला गुंडांचा पक्ष म्हटले गेले. पण हे सांगतंय कोण? सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत हे सांगितले, तर पार्टी आॅफ क्रिमीनल कोण आहे हे कळेल. खरे तर रमेश गोवेकरचे काय झाले, अंकुश राणेचे काय झाले, श्रीधर नाईक कुठे आहे, असे प्रश्न राणेंनी विचारायला हवे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या कलमे वाचून दाखवितानाच ‘शिशे के घरो में रहने वाले, दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते’, असा डायलॉगही मुख्यमंत्र्यांनी ऐकवला. भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांची अनेकदा फिरकी घेतली. राणेंना राग आल्यानंतर ते जे बोलतात ते फार गांभिर्याने घ्यायचे नसते. केंद्रातील काँग्रेस नेत्यांसह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव यांना राणे यांनी काय म्हटले होते याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. (प्रतिनिधी)