शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वेगळ्या विदर्भाचे जनआंदोलन

By admin | Published: May 02, 2015 12:52 AM

संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना नागपूरसह संपूर्ण विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा विदर्भवाद्यांनी दिला.

नागपूर : संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी महाराष्ट्र दिवस साजरा होत असताना नागपूरसह संपूर्ण विदर्भात स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा विदर्भवाद्यांनी दिला. नागपुरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने, मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत ध्वजारोहण केले. तर व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांचे पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. भारिप बहुजन महासंघाने मोर्चा काढला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तृतीयपंथीय सुद्धा मैदानात उतरले होते. त्यांनी व्हेरायटी चौकात रास्ता रोको करून लक्ष वेधले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी व्हेरायटी चौकात तासभर नारे निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपा नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. परंतु पोलिसांनी त्यापूर्वीच पुतळा ताब्यात घेतला आणि आंदोलकांना अटक केली. शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता. (प्रतिनिधी)