दिवाळी साजरी करण्यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. या सणाच्या अनेक कथाही सांगितल्या जातात. त्यापैकी नरकासुराची कथा फार प्रचलित आहे. काळानुरुप दिवाळीचे स्वरुप बदलत गेले तसतशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिवाळीची माहिती देताना त्यात अनेक बदल होत गेले. अशाच काही कथा आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. देवी महाकालीच्या राज्यात राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे देवी महाकालीने या राक्षसांचा वध केली. मात्र तरीही महाकालीचा क्रोध काही कमी झाला नाही. तेव्हा भगवान शंकराने देवीला लोटांगण घातले. यामुळे महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
२. बळीराजाने पराक्रम करून त्रौलोक्यावर विजय मिळविला होता. त्यामुळे राज्यातील इतर देव भयभीत झाले. त्यांनी भगवान विष्णुची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.
३. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जायची. मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीची पूजा करून दिवाळी साजरी केली जायची. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जाळले जायचे.
४. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती.
५. अश्विन महिन्यातच सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली.
६. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले जाते.
७. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.
८. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.
९. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.
१०. दिवाळी हा ख्रिसमसनंतरचा दुसरा असा सण आहे जो जगभरात विविध देशात भारतीय लोकांकडून साजरा केला जातो.