ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. 'ध्वनी प्रदूषण झाल्यास दंड आकारण्यात येईल' असा इशारा न्यायालयाने दिला.
येत्या ८ एप्रिल रोजी मनसेतर्फे शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका व शिवाजी पार्क पोलिसांनीही मनसेला परवानगी दिली. मात्र या मेळाव्याविरोधात वेकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 'मेळावा आयोजित करण्यासाठी आमचा आक्षेप नाही. मात्र या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यावर आमचा आक्षेप आहे. पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करून मेळाव्यादरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे,’ असे वेकॉमने उच्च न्यायालयाल सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी ८ एप्रिल रोजी मनसेतर्फे शिवाजी पार्कवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेनेही मनसेला परवानगी दिली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनीही मेळाव्यात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली. याबाबत वेकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.
‘मेळावा आयोजित करण्यासाठी आमचा आक्षेप नाही. मात्र या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यावर आमचा आक्षेप आहे. पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करून मेळाव्यादरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे,’ असे वेकॉमने उच्च न्यायालयाला सांगितले होते. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कायद्यातील तरतुदीला डावलून गुढीपाडवा मेळाव्यात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिलीच कशी? असा जाब उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. अखेर आज (बुधवार) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मनसेला मेळाव्याची परवानगी दिली खरी, मात्र ध्वनी प्रदूषण झाल्यास दंड आकारण्यात येईल' असा इशाराही न्यायालयाने दिला.