मुंबईवर्षाचा शेवट गोड करण्यासाठी सहलीचा बेत करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, बोटींग, अॅम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.
नेमकं कोणत्या सुविधा होणार सुरू?>> कंटेन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा यात नौकानयन आणि इतर मनोरंजन खेळांना परवानगी देण्यात आली आहे. >> कंटेन्मेंट झोन बाहेरील अम्युजमेंट पार्क, पर्यटनस्थळावरील इनडोअन मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे. >> कंटेन्मेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळ देखील सुरु करण्याची परवानगी
हे सर्व सरु करत असतानाच सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.