ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. ११ - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्यानंतर आज अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूरातील राजवाडा पोलीस स्थानकातील सर्वसमावेशक बैठकीनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांतर सात महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरातही अंबाबाई मंदिराच्या गर्भकुडीत जाऊन महिलांनी दर्शन घेण्याचे भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी जाहीर केल्यानंतर खरा ह्यस्थानिक आणि बाहेरीलह्ण असा श्रेयवाद रंगला. आणि यातूनंतर कोल्हापूरातील स्थानिक स्त्री-पुरुष समता समिती आणि अंबाबाई भक्त मंडळाने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे मागणी केली आणि आज त्यावर हा म्हत्वपुर्ण एतिहासिक निर्णय घेण्यात आला. बाहेरून येऊन कोणीही आंदोलन केले तर कोल्हापूरची शांतता भंग होईल, बदनामी होईल, यामुळे स्थानिक महिलांना आजच मंदिर गाभाऱ्यात प्रवेश देऊन देवीची ओटी भरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिक स्त्री-पुरुष समता समितीने राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. दरम्यान, ४ एप्रिल रोजी अवनी संस्थेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी सकाळी अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करून गाभा-या घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील महिला पुजा-यांनी त्यांना रोखून धरत प्रवेश करू देण्यास नकार दिला. यामुळे महिला कार्यकर्त्याही संतापल्या आणि मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.- तृप्ती देसाई या आंदोलनाचे श्रेय घेणार याची जाणीव झाल्याने स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळांनी रविवारीच गर्भकुडीत प्रवेश देण्याचे अचानक जाहीर केले. त्यांनी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली. श्रीपूजकही राजवाडा पोलिस ठाण्यात हजर होते.