शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पर्ससीनचे ४९४ परवाने

By admin | Published: February 06, 2016 3:43 AM

पर्ससीन पद्धतीच्या प्रचिलत किंवा कार्यरत मासेमारी परवान्यांची संख्या सध्या ४९४ इतकी आहे. ती टप्प्याटप्प्याने कमी करून २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणण्यात येणार आहे

मुंबई : पर्ससीन पद्धतीच्या प्रचिलत किंवा कार्यरत मासेमारी परवान्यांची संख्या सध्या ४९४ इतकी आहे. ती टप्प्याटप्प्याने कमी करून २६२ वर आणि अंतिमत: १८२ वर आणण्यात येणार आहे. यापुढे पर्ससीन जाळ्याने सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच मासेमारी करता येईल. तसेच मत्स्यव्यवसायाचे जतन करण्यासाठी सागरी किनाऱ्याची रचना व खंडांतर्गत उतार विचारात घेऊन पर्ससीन मासेमारीचे नियमन झाई ते बांदा दरम्यानच्या चार क्षेत्रांत खालीलप्रमाणे करण्यात येईल.आसाच्या लांबीवर निर्बंधयांत्रिक मासेमारी नौकेद्वारे पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या जाळ्यांच्या आसाच्या लांबीवर देखील नियंत्रण आणण्यात आले आहे. तारली माशांसाठी ही लांबी २५ मिलीमीटर व बांगडा माशांसाठी ती ४९ मिलीमीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जाळ्याची क्षेत्रनिहाय लांबी आणि उंची देखील ठरवण्यात आली आहे. मुरूड ते बुरुंडी क्षेत्रात लांबी १२५-५०० मीटर व उंची १०-४० मीटर, बुरु ंडी ते जयगड क्षेत्रात लांबी २५०-५०० मीटर व उंची २०-४० मीटर तर जयगड ते बांदा क्षेत्रात लांबी ३००-५०० मीटर व उंची १०-४० मीटर ठेवणे अपेक्षित आहे. मासळीच्या साठ्यांचे जतन करण्यासाठी हायड्रोलिक विंचच्या (बुम) साहाय्याने पर्ससीन जाळे ओढण्यावर बंदी घालण्यात आली असून सागरी क्षेत्रात पकडलेल्या मासळीवर रसायनांचा वापर करणे तसेच त्यांना भूल देऊन पकडणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.येथे असेल बंदीझाई ते मुरूड किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले असून या क्षेत्रात पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मुरूड ते बुरु ंडी किनाऱ्यापासून १० मीटर (५ वाव) खोलीपर्यंतचे क्षेत्र, बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून २० (१० वाव) मीटरचे क्षेत्र तर जयगड ते बांदा किनाऱ्यापासून २५ मीटर (१२.५ वाव) खालीपर्यंतचे क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापुढील क्षेत्र पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास खुले करण्यात आले आहे.