Jayant Patil: 'घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण अलीकडे दोन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले. हे राज्यघटनेसमोरील नवीन चॅलेंज आहे', अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटली यांनी इतर मुद्द्यांकडेही सभागृहाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयंत पाटील म्हणाले, "या सभागृहात विविध विचारसरणीची लोकं बसली आहेत, मात्र भारताच्या संविधानाविषयी सर्वांचे एकमत आहे. राज्यघटना बदलण्याची विविध वक्तव्ये काही लोकांनी मागील काळात केली. एका प्रदीर्घ काळानंतर संविधानाची चिकित्सा करणे तितकेच महत्वाचे आहे."
राज्यघटना हा भारताचा आत्मा
"स्वातंत्र्यानंतर भारत जास्त काळा एकसंघ राहणार नाही, असे भाकित अनेकांनी केले. तरीही आज ताठ मानेने आमचा देश उभा आहे. नित्य नियमाने पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. सत्तांतर होत आहेत. लोकांनी कधी कायदा हातात घेतला नाही. हे आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे. राज्यघटना ही भारताचा आत्मा आहे. त्यामुळेच इथे विविध जाती, धर्म, भाषेची लोकं एकत्र नांदत आहेत", असे भाष्य जयंत पाटील यांनी केले.
हेही वाचा >>"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
"सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे संरक्षक आहे. घटनेत नमूद केलेला मूलभूत अधिकारांमुळे आपण आदर्श जीवन जगत आहोत. हजारो वर्षांपूर्वीपासून असलेली बरं व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीने बदलली. सर्वांना समान अधिकार मिळावे या दृष्टीने आरक्षणाचा जन्म झाला. कलम १७ हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. कलम २१ नुसार कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही", असे जयंत पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले.
"लोकभावना डावलून कसाबला कायद्याच्या चौकटीत राहूनच फाशी देण्यात आली. घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. उत्तम संविधानांसोबतच त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा देखील उत्तम असावी लागते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच संविधानाची पाळेमुळे तळागाळात गेली", असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले.
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबद्दल चिंता
"तीन - तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच झालेल्या नाहीत. राज्यातील लोकशाहीचा खेळ सुरू आहे. घटनात्मक यंत्रणा हा सर्व खेळ पाहत बसली आहे. आजकाल व्यक्तिपूजक भक्तीपंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आले आहेत. व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी आहे. अलीकडे पंडित नेहरूंना विविध कारणांनी दोष देण्याचे काम सुरू आहे", अशी उपरोधिक टीका जयंत पाटलांनी भाजपवर केली.
"महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल ही आधुनिक भारताची दैवतं आहेत. घटना समितीत विविध विचारसरणीचे नेतृत्व होते. घटना विवेकनिष्ठ राहून व्यक्तिकेंद्री न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता. संविधानाची नैतिकता महत्वाचे आहे", असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली -जयंत पाटील
"ग्रामसभा ही सर्वोच्च सभा असते. मर्कडवाडीला वाढीत सुरू असलेल्या ग्राभेला पोलिसांनी बंदी आणली. ग्रामसभेने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव केला. निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली. नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. हे सर्व राज्यघटनेला अभिप्रेत नाही", अशी टीका जयंत पाटलांनी केली.