शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग !

By admin | Published: April 08, 2017 11:21 PM

प्रोजेक्ट ... मग तो शाळेचा असो वा कॉलेजचा सगळे केवळ ‘सबमिशन’ करण्यासाठी धडपड करत असतात, पण पुण्याच्या सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्समध्ये

- स्नेहा मोरे प्रोजेक्ट ... मग तो शाळेचा असो वा कॉलेजचा सगळे केवळ ‘सबमिशन’ करण्यासाठी धडपड करत असतात, पण पुण्याच्या सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्समध्ये तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असताना, हाच प्रोजेक्ट सीरिअसली घेतला आणि मग जमीर इफ्तेखारी या विद्यार्थ्याच्या संकल्पनेतून ‘6ixi Arts’  हा पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग प्रत्यक्षात साकारला.कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने घरातून पाच हजार रुपये आणून, त्यातून तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर उद्योग करायचा होता. त्यानंतर, त्याचे सादरीकरण करायचे होते. प्रोजेक्ट दिल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी रेडिमेड टीशर्ट्स आणि तत्सम वस्तू बाजारातून आणून विकायला सुरुवात केली, पण मला मात्र, काहीतरी वेगळे करायचे होते. बराच काळ विचार केल्यानंतर, त्यांना या पर्सनलाइज्ड गिफ्टिंगची कल्पना सुचली, असे जमीरने सांगितले. या वेगळ््या आणि हटके उद्योगाविषयी सांगताना जमीर म्हणाला की, छोट्याशा पेन आणि कीचेन्सपासून कार, बाइक्सपर्यंत प्रत्येक वस्तू ग्राहकाला हवी तशी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आम्ही कस्टमाइज्ड करतो. केवळ एका वर्षात आॅनलाइन बाजारपेठांतील प्रसिद्ध पोर्ट्ल्सने आम्हाला टायअपसाठी विचारणा केली आहे, त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून, सध्या महाराष्ट्रातील मेट्रो शहरांसह बंगळूरमध्ये आम्ही पोहोचलो आहोत.माझ्या मित्रांमध्ये अनेक चांगली कौशल्ये आहेत. मात्र, त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळत नव्हते. त्यांच्यात खूप चांगल्या क्षमता आहेत आणि त्या दाखवण्याकरिता एका व्यासपीठाची आवश्यकता होती. मी व्यवसायाची कल्पना त्यांना सांगताच त्यांनीदेखील मला समर्थन दिले आणि ‘6ixi Arts’ ची सुरुवात झाली. जमीर याच्यासोबतच त्याचा मित्र ओमकार परब हा या उद्योगाचा सह-संस्थापक आहेत. २०१६ साली या सुरुवात केली सुरुवातीच्या दिवसापासूनच हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून, त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे, असे जमीरने सांगितले.विशेष म्हणजे, भारतात इतरत्र कुठेही न मिळणारे ‘एम्बिग्राम कीचेन्स’ या आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्या संपूर्ण देशभरात कोठेही मिळत नाहीत, असे जमीर अभिमानाने सांगतो. याशिवाय पर्सनलाइज्ड लॉकेट, माउस पॅड आणि इतर गोष्टीदेखील येथे मिळतात. महाविद्यालयीन शिक्षण संपतानाच, सुरुवातीच्या दिवसांत अनेक अडचणी आल्या, तसेच या करिअरची पार्श्वभूमी नसल्याने बाराखडीपासून सुरुवात केली. व्यावसायाकरिता लागणारे सॉफ्टवेअर शिकून घेणे, भांडवल गोळा करणे, पैसा उभा करणे अशा अनेक गोष्टी रात्रीचा दिवस करून शक्य केल्यात. सध्या या उद्योगाचे काम आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतींनी चालते. आॅर्डर घेतल्यानंतर ते तिचे यशस्वी वितरण करेपर्यंत ही टीम कायम ग्राहकांच्या संपर्कात असते. या उद्योगातून मिळणारा ६० टक्के नफा आम्ही शैक्षणिक कार्यासाठी वापरण्याचा मानस असल्याचे जमीरने सांगितले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फेसबुक कोणत्याही युझरला आपल्या मित्रपरिवाराच्या वाढदिवसाचे १५ दिवसांपूर्वी रिमाइंडर मिळेल. त्याच वेळी त्या मित्राला वाढदिवसाला गिफ्ट द्यायची इच्छा आहे का? असेही युझरला विचारून पर्सनलाइज्ड गिफ्टिंगच्या उद्योगांच्या लिंक्स शेअर करण्यात येतील. जेणेकरून, गिफ्टिंग सोपे व्हावे आणि सेलिब्रेशनसह तो वाढदिवस स्मरणात राहावा. भविष्यात बिग डेटा आणि हुडूप या इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुकशी हातमिळवणी करून देशभरातील पर्सनलाइज्ड गिफ्टिंग उद्योगांना एकाच व्यासपीठावर आणायचे आहे, त्याची प्रक्रिया सुुरू झाली आहे. मात्र, हा मोठा पल्ला असल्याने, यासाठी वेळ जावा लागेल, असे जमीरने सांगितले.

-moresneha305@gmail.com