शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पेशवेकालीन परंपरा : नाशिककरांनी जोपासला रहाड रंगोत्सव

By admin | Published: March 16, 2017 6:53 PM

नाशिककरांच्या रहाड रंगोत्सवाच्या परंपरेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिकमध्ये सध्या चार पेशवेकालीन रहाडी (मोठा भूमिगत हौद) आहेत.

नाशिक : नाशिककर धूलिवंदनला रंग खेळत नाही तर होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. नाशिककरांच्या रहाड रंगोत्सवाच्या परंपरेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिकमध्ये सध्या चार पेशवेकालीन रहाडी (मोठा भूमिगत हौद) आहेत. या रहाडींमध्ये नाशिककर रंगपंचमीला रंगात न्हाऊन निघतात. शहरातील तीन रहाडी खुल्या करण्यात येऊन रंगपंचमीसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.नाशिक शहरात रंगपंचमी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या रंगोत्सवाचे वेगळेपण आहे ते म्हणजे रहाडीचे. पेशवेकालीन खोदलेल्या रहाडी नाशिककरांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत. शहरातील जुने नाशिक गावठाण भागात या रहाडी भूमिगत आहेत. वर्षभर या रहाडींवरून रहादारी सुरू असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच या रहाडींच्या जागेवर विधिवत पूजन क रून रहाड खोदण्यास सुरुवात करण्यात आली होती. पंचवटीमधील शनि चौक, गोदाकाठावरील संत गाडगे महाराज पुलालगतचा दिल्ली दरवाजा परिसरात आणि जुन्या तांबट गल्लीमधील रहाडी रंगोत्सवासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच या रहाडी पूर्णपणे खुल्या करण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली आहे.

नाशिकचा रंगोत्सव या रहाडींमुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. नाशिककर या रहाडी पक्का रंग टाकून पाण्याने भरतात. रहाडीच्या चारही बाजूंनी युवक उभे राहून नंतर त्यामध्ये ‘सूर’ फेकतात. या सूर फेकण्याच्या पद्धतीलादेखील गमतीदार नावाने ओळखले जाते. ते नाव म्हणजे ‘धप्पा’. हा धप्पा जेव्हा एखादा युवक घेतो तेव्हा रहाडीभोवती असलेले अन्य २५ ते ५० लोक रहाडीच्या उडणाऱ्या पाण्यानेच ओलेचिंंब होतात. हा रहाड रंगोत्सव प्रसिद्ध आहे तो अशा सामूहिक रंगात रंगत अंघोळीसाठी. जो उत्तमपणे उंच उडी मारतो तोच या धप्प्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. नाशिककरांनी आपली पेशवेकालीन रंगपंचमीची आगळीवेगळी पारंपरिक प्रथा आजही जोपासली आहे.