शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

अनधिकृत नर्सिंग होमविरोधात याचिका

By admin | Published: January 21, 2017 11:18 PM

अनधिकृत नर्सिंग होमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय यंत्रणा उपलब्ध आहे? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली.

मुंबई : अनधिकृत नर्सिंग होमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय यंत्रणा उपलब्ध आहे? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. एकट्या पुण्यात सुमारे ४ हजार अनधिकृत नर्सिंग होम्स असल्याचा दावा पुण्याच्या एका रहिवाशाने केला आहे.अतुल भोसले यांनी अनधिकृत नर्सिंग होम्सविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.एकट्या पुण्यात चार हजाराहून अधिक अनधिकृत नर्सिंग होम्स आहेत. या नर्सिंग होममध्ये बोगस पदवी घेतलेले डॉक्टर काम करतात. त्यामुळे येथे दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या जिवाला धोका आहे. राज्य सरकारकडे याबद्दल वारंवार तक्रार करूनही राज्य सरकारने काहीही कारवाई केली नाही. सरकार महाराष्ट्र नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९ची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे. कायद्याची अंलबजावणी करण्याचा आदेश सरकारला द्यावा आणि संबंधितांवर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर खंडपीठाने चिंता व्यक्त केली. एकट्या पुण्यातच चार हजार अनधिकृत नर्सिंग होम्स आहेत तर राज्यातील प्रत्येक शहरात किती अनधिकृत नर्सिंग होम्स असतील, याची कल्पनाच केलेली बरी. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे काय यंत्रणा उपलब्ध आहे, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)