औरंगाबाद : जळगाव येथील घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी 15 दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याशिवाय यापूर्वीच्या अन्य दोन याचिका खंडपीठात दाखल आहेत. या तिन्ही याचिका एकत्रित सुनावणीसाठी बुधवारी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर आल्या असता न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी ठेवली.
जळगाव महानगरपालिकेने बेघरांसाठी घरकुल योजना आणली होती. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आ. सुरेशदादा जैन यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी जैन हे सध्या धुळे येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच हा खटला धुळे येथील विशेष न्यायालयात सुरू आहे.
या वेळी जैन यांच्या वतीने युक्तिवाद करताना माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ विधिज्ञ सलमान खुर्शिद म्हणाले की, गुन्ह्याच्या वेळी जैन हे महाराष्ट्रात गृहनिर्माणमंत्री होते. शासनाच्या परवानगीशिवाय त्यांच्या विरोधात खटला चालविता येणार नाही. घटनेनुसार जैन यांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण होणो आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावरील आरोपाची शहानिशा ही खटला सुरू झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे तोर्पयत त्यांना जामीन देता येऊ शकतो. शिवाय ते सध्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असल्याने 15 दिवसांचा तात्पुरता जामीन देण्याबाबत सहानुभूतीने विचार करावा. अॅड. खुर्शिद यांचा तासभर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी 8 ऑक्टोबर्पयत पुढे ढकलली.
च्जैन जळगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीसाठी 15 दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. तसेच यापूर्वी त्यांनी नियमित जामीन मिळावा, यासाठी 2क्13 मध्ये क्रिमिनल अर्ज क्रमांक 613 आणि 2क्14 मध्ये 5412 दाखल केलेला आहे. या तिन्ही अर्जावर आज न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.