परभणी- सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ करत आहेत. आज म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली. कंपन्यांनी महानगरांसह देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये या नवीन किमती जारी केल्या आहेत. दरम्यान, भारतात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये(Parbhani) मिळत आहे.
'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' असे म्हणत परभणीची वैशिष्ट्य सांगितली जातात. यातच आता परभणी देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळणारे शहर म्हणून समोर आले आहे. आज 4 एप्रिल रोजी परभणीत पेट्रोलचा दर दर प्रतिलिटर रु. 121.34 आणि डिझेलचा दर प्रतिलिटर रु. 103.95 वर पोहोचला आहे. यामुळे आता परभणी भारतातील सर्वात पेट्रोल-डीझेल मिळणारे शहर झाले आहे.
परभणीतील जास्त दरांचे काय कारण?पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना भर उन्हाळ्यात आर्थिक झळाही सोसाव्या लागत आहेत. परभणीला महागाईची ही झळ काही प्रमाणात जास्त बसतेय. या दर वाढीचे महत्वाचे कारण म्हणजे मराठवाड्यात इंधन साठवण्यासाठी डेपो उपलब्ध नाही. परभणीला उत्तर महाराष्ट्र अथवा विदर्भातून इंधन आणावे लागते. विदर्भातून इंधन परभणीपर्यंत येण्यासाठी किंवा मनमाड मार्गे परभणीत इंधन येण्यासाठीचा खर्च जास्त लागतो. मनमाडवरून परभणीपर्यंतचे अंतर 350 किलोमीटरपर्यंत पडते. हा खर्च वसूल करण्यासाठी परभणीचे पेट्रोलचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त दिसून येतात.
देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-दिल्ली पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लिटर-मुंबई पेट्रोल 118.83 रुपये आणि डिझेल 103.07 रुपये प्रति लिटर-चेन्नई पेट्रोल 109.34 रुपये आणि डिझेल 99.42 रुपये प्रति लिटर-कोलकाता पेट्रोल 113.45 रुपये आणि डिझेल 98.22 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातातपेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतात.