गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोलडिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Hike) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास तीन रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून वाढणारच असल्याचं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून वाढणार आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवरच इंधनाच्या किंमती वाढायला लागल्या आहेत. म्हणून अर्थसंकल्प सादर करताना गॅस सिलिंडर वापरणारा महिला वर्ग असेल, सीएनजीवर चालणाऱ्या बसेस, ऑटो, चारचाकी असतील त्यांना १ हजार कोटी रुपयांचा कर माफ केला आहे. कोरोनाच्या नंतरचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यात वाढ न करता आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलाय. सरकारही चाललं पाहिजे, लोकांना मदतही झाली पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे अशी आमची भूमिका होती," असंही पवार म्हणाले.तोपर्यंत सरकार व्यवस्थित चालणार"अधिवेशनादरम्यान आम्ही सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनापूर्वी खुप काही असं होणार तसं होणार असं बोललं गेलं होतं. तारखाही जाहीर केल्या होत्या. गेले अडीच वर्ष आपण हे पाहत आलो. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या तिघांनी ठरवलंय तोवर हे सरकार व्यवस्थित पणे चालणार," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
३.२० रुपयांची वाढजवळपास काही महिने स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) पुन्हा एकदा उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पाच दिवसांत तब्बल चार वेळ इंधन कंपन्यांनी ही वाढ केली. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली. अशा प्रकारे पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ झाली.
या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये शनिवार २६ मार्च २०२२ रोजी पेट्रोलचे दर ९८.६१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.९७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. शनिवारी मुंबईत पेट्रोलचे दर ८४ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी वाढले. यानंतर मुंबईत शनिवारी पेट्रोलचे दर ११२.५१ रुपये प्रति लिटरवरुन वाढून ११३.३५ रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलची किंमतही ९६.७० रुपये प्रति लिटरवरून वाढऊन ९७.५५ रुपये प्रति लिटर झाले आहे.