- मध्यरात्रीपासून नवे दर; राज्याने वाढविला अधिभारनागपूर : राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढविल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पेट्रोल ३ रुपयांनी महागले. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रति लिटर पेट्रोलवर ६ रुपये अधिभार लावण्यात येतो. आता राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयाने अधिभार वाढवून ९ रुपये केला आहे. याचप्रकारे २६ टक्के मूल्यवर्धित कर आणि ९ रुपये अधिभार लावल्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महाग झाले आहे.यापूर्वी २६ टक्के मूल्यवर्धित कर आणि ६ रुपये अधिभार लावला होता. हा अधिभार राज्यात दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारने लावला होता. दुष्काळी भागातील पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी या रकमेचा उपयोग करण्यात येत होता. दुष्काळी मदत अधिभाराची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपलेली आहे. सद्यस्थितीत राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही, त्यानंतरही अधिभाराची वसुली सुरूच आहे. आता सरकारने ‘दुष्काळी मदत’ हा शब्द हटवून अधिभार वाढविला आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोल तीन रुपयांनी महाग
By admin | Published: April 22, 2017 4:40 AM