नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याच्या कारणास्तव सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ लागू केली. त्यानुसार पेट्रोल प्रतिलीटर ३.१३ रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर २.७१ रुपयांनी महाग झाले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एप्रिल अखेरीसही मोठी वाढ झाली होती. या नव्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर ६६.२९ रुपये आणि डिझेल प्रतिलीटर ५२.२८ रुपयाला मिळेल. तसेच मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर ७४.१२ रुपये तर डिझेल प्रतिलीटर ५९.८६ रुपयांत मिळेल.
पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
By admin | Published: May 16, 2015 3:58 AM