ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि.१६ : तेल पुरवठा कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ५८ पैशांनी वाढ केली आहे. मात्र डिझेलचे भाव प्रती लिटर ३१ पैशांनी कमी करण्यात आले आहेत. या वाढीव दरात राज्य सरकारांच्यावतीने लावल्या जाणाऱ्या करांचा समावेश नाही. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या लोकांना पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती वाढल्यानं ही भाववाढ केल्याची माहिती यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे.इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर सरकारी तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी, म्हणजेच दर महिन्याची पहिल्या आणि 16 व्या दिवशी इंधनाचे नवे दर जाहीर करतात. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलनाचा विनिमय दर याचा आधार घेतला जातो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.
पेट्रोल महाग तर डिझेल स्वस्त
By admin | Published: September 16, 2016 4:25 AM