नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून सोमवारी या दोन्ही इंधनांच्या किमतीमध्ये लिटरमागे ४० पैशांची वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातनांदेडमध्येपेट्रोलचे दर सर्वेाच्च आहेत.
गेल्या १४ दिवसांमधील ही १२ वी दरवाढ असून त्याकाळात इंधनाचा दर ८.४० रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्येनांदेडमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. येथे पेट्रोल १२१.२३ रुपये, तर डिझेल १०१.४२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. सुमारे साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्चपासून त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. गेल्या १४ दिवसांपैकी १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.