ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने भारतीय पेट्रोल कंपनीने देशातही पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल प्रतिलिटर ३ रुपये रुपये ०७ पैसे तर डिझेल १ रुपया ९० पैशांनी महाग होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिजेलचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आईओसीएल) ने सांगीतले कि, आज मध्यरात्रीपासून दिल्लीत पेट्रोल ५६.६१ रुपये प्रतिलिटर ऐवजी ५९.६८ रुपये प्रतिलीटर मिळेल. तर डिजेल ४६.४३च्या ऐवजी ४८.३३ रुपये एवढ्या किंमतीत मिळेल.
लगातार ७ वेळा पेट्रोलच्या किंमती कमी केल्यानंतर गत पाच महिन्यांतील पेट्रोलची ही दुसरी भाववाढ आहे; तर डिझेलची ऑक्टोबरनंतरची चौथी दरवाढ आहे.