मुंबई: पेट्रोल पंपावरील चोरीप्रकरण नवीन नाही, मात्र ही चोरी रंगेहाथ पकडण्याचे धाडस एका मुंबईकर तरुणीने केले आहे. सोशल मीडियाच्या योग्य वापराने चुकीच्या गोष्टींना वाचा फोडता येते, हे या तरुणीने पटवून दिले आहे. कांदिवली चारकोप येथील अमी सेठ या तरुणीने ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला आहे.मुंबईतील चारकोप परिसरातील बीपीसीएल कंपनीच्या पेट्रोलपंपवर पेट्रोल चोरीचे प्रकार घडत होते. अमी सेठ या तरुणीने या सर्व प्रकाराचे ‘फेसबुक लाईव्ह’ केले. हा सर्व प्रकार घडत असताना, पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिस ठाण्यामधूनही तरुणीने ‘फेसबुक लाईव्ह’ करत प्रकरणाला वाचा फोडून तरुणाईसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.अमी सेठने ‘फेसबुक लाईव्ह’ केलेला हा व्हिडिओ १० लाखांहून अधिक नेटिझन्सने पाहिला तर ४२ हजारांहून अधिक नेटिझन्सने शेअर केला आहे. तसेच, अनेकांनी या व्हीडिओबद्दल अमीचे कौतुक करत खऱ्या अर्थाने अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)>पोलिसांची तक्रार घेण्यास नकारपेट्रोल पंपावरील हे चोरीचे प्रकरण ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून समोर आणल्यानंतर त्याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासही पुढाकार घेतला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर अमीने पोलिस ठाण्यातूनच पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’ करत पोलिसांच्या भूमिकेविरोधात आपला संताप व्यक्त केला.
‘फेसबुक लाइव्ह’मधून उलगडली पेट्रोल पंपावरील चोरी
By admin | Published: March 04, 2017 1:49 AM