मुंबई : हेल्मेट सक्तीचा वेगळा प्रयत्न म्हणून ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’च्या घेतलेल्या निर्णयापासून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी माघार घेतली. आता यापुढे जे वाहनधारक हेल्मेट न घालता पेट्रोल घेतील अशा वाहनांचे क्रमांक पेट्रोल पंपधारकांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत.विना हेल्मेट पंपावर आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचा निर्णय परिवहन मंत्री रावते यांनी घेतला होता. मात्र, राज्यातील पंपचालकांनी त्यास विरोध करत बंदची हाक दिली होती. या निर्णयामुळे दुचाकीस्वारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तर पंपचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)>हेतू प्रामाणिक‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’संदर्भात २८ जुलै रोजी विधानसभेत चर्चा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावते यांचा हेतू प्रामाणिक असल्याचे सांगत या प्रश्नातून मध्यमार्ग काढण्याचे सूचित केले होते. त्यानुसार मंत्री रावते यांनी शुक्रवारी विधासभेत निवेदन केले.>पुढील कारवाई आरटीओने करावी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’बाबत पेट्रोलपंपधारकांशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी पेट्रोल घेताना हेल्मेट न घातलेलया वाहनधारकांचे पेट्रोल दिल्यानंतर त्यांच्या वाहनांचे क्रमांक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास कळवतील असे चर्चेत ठरले. पुढील कारवाई ही आरटीओने करायची आहे, असे रावते यांनी सांगितले.
हेल्मेटशिवाय पेट्रोल!
By admin | Published: August 06, 2016 5:34 AM