औरंगाबाद : विविध ‘ऑनलाईन’ सुविधा मिळविण्यासाठी आधार आणि पॅनकार्ड, तसेच बँक खात्याचे विवरण, हे ‘केवायसी’ दस्तावेज युनिफाईड पोर्टलशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ आहे. या निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही.
ऑनलाईन दाव्याचे निराकरण, सदस्य ई-पासबुक डाऊनलोड करणे, युएएन कार्ड, पोर्टिबिलिटी, मासिक सदस्य अंशदान सूचना, एसएमएसद्वारे आॅनलाईन दाव्याचे हस्तांतरण आदी सुविधांचा लाभ घेता येणार नाही.
यासंदर्भात कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयात एक केंद्र सुरू करण्यात आले आहे, असे औरंगाबाद विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम. एच. वारसी यांनी कळविले आहे.