शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

फणसाळकर एटीएस प्रमुख

By admin | Published: April 14, 2015 2:48 AM

राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची साइड पोस्टिंगला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांना आणण्यात आले आहे.

३७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्या : कार्यकारी पदांवरील अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंगमुंबई : राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची साइड पोस्टिंगला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांना आणण्यात आले आहे. नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन नागपूरचे आयुक्त के. के. पाठक यांची बदली करण्यात आली खरी; परंतु त्यांना पुणे शहराच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. एस.पी. यादव हे आता नागपूरचे आयुक्त असतील. ३७ महत्त्वाच्या पदांवरील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांचा आदेश सोमवारी सरकारने काढला. सर्वात धक्कादायक बदली फणसाळकर यांची ठरली. ते मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) होते. एटीएसच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळणाऱ्या हिमांशू रॉय यांची थेट पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळावर बदली करण्यात आली. युती सरकारने पोलीस दलात केलेला हा पहिला मोठा फेरबदल आहे. २६/११ हल्ल्यानंतर प्रस्तावित असलेले व सध्या रिक्त असलेले सहावे महासंचालक पद भरणे, मुंबईच्या आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सह आयुक्तपदाची निर्मिती करणे व सातत्याने कार्यकारी पदांना चिकटलेल्या अधिकाऱ्यांना अकार्यकारी किंवा साइड पोस्टिंग देणे हाच या बदल्या-बढत्यांमागे मुख्य हेतू असल्याचे दिसून येते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील आणि नागपूरशी संबंधित अधिकाऱ्यांना त्या जागी आणले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेची सुरुवात नागपूरचे तत्कालीन आयुक्त के. के. पाठक यांच्यापासून सुरू झाली होती. त्यांना नागपूरहून उचलून मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात येईल. त्यासाठी सध्याचे मुंबई आयुक्त राकेश मारिया यांची अन्यत्र बदली केली जाईल, असे बोलले जात होते. मात्र सरकारने पाठक यांना मुंबईत आणले नसले तरी त्याखालोखाल महत्त्वाचे मानले जाणारे (पुणे आयुक्त) पद बहाल केले. तर नागपूर आयुक्तपदाची जबाबदारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर महासंचालक एस.पी. यादव यांच्याकडे सोपविण्यात आली. औरंगाबादचे आयुक्त राजेंद्र सिंह यांची बदली नियोजन आणि समन्वय, महासंचालकपदी केली असली तरी त्यांच्या जागी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. नागपूर कनेक्शनरा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरशी संबंध असलेल्या वा आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला महत्त्वपूर्ण पदे आली. 1. नागपूरचे आयुक्त के. के. पाठक यांना पुण्यासारख्या शहराचे आयुक्तपद2. फणसाळकर यांना एटीएस प्रमुखपद3. अनुप कुमार सिंह मुंबईचे सह आयुक्तमाथूर सहावे महासंचालकपुण्याचे आयुक्त सतीश माथूर यांना बढती देत विधी व तांत्रिक विभागाचे महासंचालक करण्यात आले. २६/११ हल्ल्यानंतर राज्यात सहावे या दर्जाचे पद निर्माण करण्यात आले होते आणि जयंत उमराणीकर यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कालांतराने या पदाचा दर्जा महासंचालकऐवजी अतिरिक्त महासंचालक असा कमी करण्यात आला. नव्या आदेशांनुसार माथूर यांना महासंचालकपदी बढती मिळाल्याने ते पद पुन्हा प्रस्थापित झाले. त्यामुळे आता सहा महासंचालक आहेत.आर्थिक गुन्हे अन्वेषणसाठी स्वतंत्र सहआयुक्तसरकारने मुंबई गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत असलेल्या आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्त पद निर्माण केले. आर्थिक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे हा सरकारचा हेतू असावा. या नव्या पदाची जबाबदारी तत्कालीन सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था, मुंबई) धनंजय कमलाकर यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात प्रशासन, कायदा-सुव्यवस्था, गुन्हे, वाहतूक विभागांच्या जोडीला पाचवे सहआयुक्तपद तयार झाले.