शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

मराठामोर्चात शिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 4:51 AM

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी मुंबई काबीज करून गेला. मंगळवारपासून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे बुधवारी सकाळी ११ वाजता राणीबाग मैदानापासून मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले.

चेतन ननावरे मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला मराठा क्रांती मोर्चा अखेर बुधवारी मुंबई काबीज करून गेला. मंगळवारपासून मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे बुधवारी सकाळी ११ वाजता राणीबाग मैदानापासून मोर्चाला सुरुवात केली. दुपारी १ वाजून ०५ मिनिटांनी मराठा जनसागराची ही लाट आझाद मैदानावर धडकली. त्यावेळी मोर्चाचे शेवटचे टोक राणीबागेजवळच होते.या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले. मोर्चाला सुरुवात होण्याआधी वाहतूक पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाणारी एक मार्गिका सुरू ठेवली होती. राणीबाग उड्डाणपुलाखालून जाणाºया रुग्णवाहिकेला पोलीस आणि मराठा स्वयंसेवकांनी काही सेकंदात मार्ग करून दिला. त्यामुळे अवघ्या काही क्षणांत जेजे रुग्णालयाकडे ती रवाना झाली. त्यानंतर एकदा सेंट जॉर्ज रुग्णालयाकडे जाणाºया रुग्णवाहिकेला आणि पुन्हा ‘बाइक अ‍ॅम्ब्युलन्स’ला मोर्चेकºयांनी वाट देत शिस्तीचा प्रत्यय दिला. पुढे महिला, त्यामागे पुरुष अशी रचना असलेला मोर्चा निघाला खरा. मात्र त्याआधीच मोर्चापुढे लाखो आंदोलक जमा झाले होते. त्यामुळे सव्वालाख आंदोलकांमागे महिला आंदोलक आणि त्यामागे पुन्हा पुरुष आंदोलक अशी मोर्चाची रचना झाली. परिणामी, जेजे उड्डाणपुलापर्यंत महिला आंदोलक पोहचेपर्यंत सुमारे लाखाहून अधिक आंदोलकांनी उड्डाणपूल व्यापून टाकला होता.लक्षवेधी वेशभूषाउस्मानाबादमधील भूम तालुक्यातील संदीप लहाणे या शेतकºयाने कर्जमाफीची मागणी करत प्रतिकात्मक फाशीचा देखावा सादर करत मोर्चात सहभाग नोंदवला. शिवरायांसह मराठमोळ्या लावण्यवती आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सामील झालेल्या मराठा आंदोलकांनी विशेष लक्ष वेधले. घोड्यावर स्वार झालेले दोन आंदोलक ऐटबाज दिसत होते. औरंगाबादहून हाती पेटती मशाल घेऊन अर्धनग्न अवस्थेत मोर्चात सामील आईसाहेब युवा संघटनेचे कार्यकर्तेही लक्ष वेधून घेत होते.असाही पाहुणचार!भायखळ्यातील जय महाराष्ट्र गोविंदा पथकातील गोविंदांनी रात्रभर राणीबाग मैदानाजवळ जमणाºया वाहनांना कॉटनग्रीन येथे पार्किंगसाठी मार्गदर्शन केले. तर डी. पी. वाडीची माऊली नवरात्रौत्सव मंडळाने आंंदोलकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कापरेश्वर कृपा गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी आंदोलकांना चहापाणी दिले.

 पोलिसांचा १५ तासांचा कडेकोट बंदोबस्त लाखोंचा सकल मराठा मोर्चा सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुमारे ३५ हजार पोलीस सलग १५ तास झटत होते. पहाटे साडेपाच वाजल्यापासून तैनात असलेला बंदोबस्त रात्री आठच्या सुमारास शिथिल करण्यात आला. मात्र बंदोबस्ताच्या ताणापेक्षा मोर्चा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणे पार पडल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर होते.आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बंदोबस्ताचे नेटके नियोजन करीत त्याची काटोकोर अंमलबजावणी करत हे आव्हान पार पाडले. मुंबई पोलीस दलातील २५ हजार पोलीस व केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या असा जवळपास ३५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बुधवारी होता.केवळ दक्षिण मुंबईत आझाद मैदान, सीएसटीएम, फोर्ट परिसरात तब्बल दहा हजार पोलीस तैनात होते. बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह भायखळापासून ते आझाद मैदानपर्यंतचा परिसर श्वान पथकाच्या मदतीने पिंजून काढला. तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. गृहराज्यमंत्र्याची ‘कंट्रोल रूम’ला भेटआंदोलकांच्या विराट गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करण्यात आला. सहआयुक्त देवेन भारती नियंत्रण कक्षातून नियोजन करीत होते. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दुपारी नियंत्रण कक्षाला भेट दिली.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा