ऑनलाइन लोकमत -
(छायाचित्रे : गणेश शेटकर)
पणजी, दि. 16 - आषाढी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला माशेल गावात चिखलकाला खेळला जातो. ही खूप जुनी परंपरा आहे. भर पावसात आबालवृद्ध चिखलमय होऊन जातात. श्रीकृष्णाच्या बाललीलांना या चिखलकाल्याच्या परंपरेने उजाळा दिला जातो. गोव्यात पावसाने सध्या तरी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याचा वापर करावा लागला. येथून पूर्वेकडे सुमारे वीस किलोमीटरवरील माशेल गावात हा सोहळा शनिवारी रंगला. या गावात विविध देवतांची सुमारे ३५ मंदिरे आहेत.