शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

भगवानगडावर धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक

By admin | Published: January 06, 2015 2:49 AM

भगवानगडावर दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी दगडफेक करण्यात आली.

दर्शन न घेताच माघारी परतले : घटनेमागे भाजपा कार्यकर्ते असल्याचा आरोप, श्रद्धेला राजकीय रंगपाथर्डी (जि. अहमदनगर) : भगवानगडावर दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे त्यांना दर्शन न घेताच माघारी जावे लागले. या घटनेमागे भाजपा कार्यकर्ते असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. या घटनेमुळे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. ३० डिसेंबरपासून भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधी सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाची सांगता मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे गडावर दर्शनासाठी आले होते़ धनंजय मुंडे आल्याचे पाहताच काहींनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली़ गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या निवासस्थानी मुंडे थांबले होते़ तोपर्यंत बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे मुंडे समाधीचे दर्शन न घेताच मंदिराच्या मागच्या बाजूने गाडी काढून निघाले. काही जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली़ सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही़ पोलीस प्रशासनाला मुंडे येणार असल्याचे माहिती होते; तरीही पोलिसांनी गडावर अपेक्षित बंदोबस्त ठेवला नाही. बंदोबस्त असता तर असा प्रकार घडला नसता, असे भाविकांनी सांगितले़ (प्रतिनिधी)भगवान बाबांवर माझी निर्मळ श्रद्धा आहे. हे राजकारण करण्याचे स्थान नाही. बाबांच्या समाधीचा सुवर्ण महोत्सव असल्याने दर्शनासाठी जात असताना माझ्या ताफ्यावर झालेली दगडफेक दुर्दैवी आहे. भाजपाच्या विघ्नसंतोषी लोकांनी हा प्रकार केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.