शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’

By admin | Published: June 28, 2016 10:45 AM

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’...

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे ‘काश्मीरच’...  अनोखं निसर्गसौंदर्य, काजवा महोत्सव आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेले हे शहर म्हणजे सर्व ऋतुंमध्ये पिकनिकसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे...
 
हिरव्यागार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरुन फेसाळत वाहणा-या पांढ-याशुभ्र धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेचच शुभ्र धुक्यांनी लपेटून घेतलेले रस्ते, या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली अवतरतात हिरवेगार गालिचे. हे निसर्गसौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग ही पवर्तराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढय़ात उभी ठाकत़ अशा या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल आणि काजवा महोत्सव पहायचा असेल तर अकोलेला जायलाच हवे.
सर्वात उंच म्हणजे 1646 मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर, सर्वाधिक पावसाचे ठिकाण रतनवाडी-घाटघरही अकोले तालुक्यातच. येथील निसर्गसौंदर्य बहरते ते पावसाळ्यात, तेव्हाचा जलोत्सव आणि ऑक्टोबरनंतरचा फुलोत्सव तर जूनमधील काजवा महोत्सव पाहण्यासाठी निसर्गपर्यटकांची पावले अकोलेची वाट धरतात. 
अनेकजण फक्त भंडारदरा, रंधा धबधबा, कळसुबाई, रतनगड-घाटघर हे स्पॉट पाहून माघारी फिरतात. भैरवगड, बाबरगड, पट्टा किल्ला, बितनगड अशी ठिकाणेही आपल्यातील साहसाला आव्हान देत उभी ठाकलेली आहेत.
 
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
 
अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे 
 
भंडारदरा धरण- 
या धरणाचा परिसर चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आह़े भंडारदरा धरणाच्या उजवीकडून घाटघर-साम्रद-रतनगडमार्गे पुन्हा भंडारदरा अशी परिक्रमा केल्यास फेसाळणारे धबधबे मनाला लुब्ध करतात.
 
साम्रद - 
घाटघरपासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेली सांदणदरी़ या दरीत जाण्याऐवजी दूरुनच पावसाचा आनंद घ्यावा़ 
 
रतनगड - 
साम्रदपासून आठ किलोमीटरवर रतनगड हा प्राचीन किल्ला आहे. 
 
कळसुबाई - 
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखऱ हे शिखर आणि कळसुबाईच्या रांगेतच अलंग, मलंग, कुलंग आणि मदनगड हे किल्ले साहसी पर्यटकांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतात. 
 
रंधा धबधबा - 
भंडारद-यापासून 10 किलोमीटरवर असलेला हा धबधबा 17 फूट उंचीवरुन खाली कोसळताना पाहणो डोळ्याचे पारणो फेडणारे ठरते. याशिवाय अंब्रेला, नेकलेस धबधबेही पाहण्यासारखीच आहेत.
 
हरिश्चंद्रगड - 
साहसी पर्यटकांना आव्हान देत हा गड उभा आहे. सुमारे सोळाशे वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर, दहा गुहा आणि अनेक औषधी व दुर्मीळ वनस्पतींनी बहरलेली वनराई हे हरिश्चंद्रगडाचे वैशिष्टय़ सांगता येईल़ गडावरील कोकणकडा आणि त्याच रांगेत कुंतलगड आहे. 
 
काय पहाल ?
जूनमध्ये काजवा महोत्सव, यानंतर धो-धो कोसळणारा पाऊस आणि फेसाळणारे प्रचंड धबधबे, हिरवागार निसर्ग
घाटघरचा कोकणकडा- सांम्रद, येथील सांदणदरी, रतनवाडी, प्राचीन हेमाडपंथी अमृतेश्वराचे मंदिर, रतनगड
गिर्यारोहणासाठी- अलंग, मलंग, कुलंग हे दुर्ग
भंडारदरा- निळाशार जलाशय, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची व्यवस्था, मनाला भुरळ घालणारे आकर्षक उद्यान
रंधा- पर्यटन विकासातून केलेले विलोभनीय काम, रंधा धबधबा
हरिश्चंद्रगड परिसर- पावसाळ्यात जलोत्सव, ऑक्टोबरनंतर फुलोत्सव, महाकाय कोकणकडा, हरिश्चंद्रगड
अकोले येथे महामुनी अगस्ती महाराजांचे मंदिर
टाकाहारी येथे प्राचीन देवीचे मंदिर
विश्रमगड-शिवाजी महाराजांचे विश्रंतीस्थान आणि येथे अवतरत असलेली शिवसृष्टी
 
कसे जाल?
मुंबईहून कसारा-इगतपुरी-घोटी-वारंघुशी-भंडारदरा
एकूण अंतर 180 किलोमीटर
पुण्याहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदरा
एकूण अंतर 170 किलोमीटर
नाशिकहून घोटी-बारी-वारंघुशी-भंडारदरा
एकूण अंतर 80 किलोमीटर
शिर्डीहून संगमनेर-अकोले-राजूर-भंडारदरा
एकूण अंतर 90 किलोमीटर
 
निवास व्यवस्था
भंडारदरा येथे पर्यटन विकास महामंडळाने निवासी खोल्या बांधलेल्या आहेत़ वन्यजीवमार्फत तीन क्लासवन सूट, 2 जनरल सूट आहेत़ 
घाटघर येथे वन्यजीवमार्फत सहा खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध होऊ शकतात़ 
गृहपर्यटनमधून रतनवाडी, घाटघर, सांम्रद येथे 18 खोल्या उपलब्ध आहेत़ 
याशिवाय खासगी रिसोर्टमध्येही निवासाची व्यवस्था होऊ शकत़े पर्यटकांना टेंटमध्ये रहायचे असल्यास टेंटही उपलब्ध करुन दिले जातात
 
ऑक्टोबरमधील पुष्पोत्सव 
हरिश्चंद्रगड परिसरात असंख्य आणि विविध रंगी फुलांचा पुष्पोत्सव ऑक्टोबरमध्ये बहरतो़ हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची अनुभूती देणारा हा फुलोत्सव पावसाळा संपत आल्यानंतर सुरु होतो़ दर सात वर्षानी फुलणारी ‘कारवी’ हेही इथले खास आकर्षण. निळ्या रंगाची कारवी फुलते तेव्हा हरिश्चंद्रगडावर निळी शाल पांघरल्याचे दिसते. आता 2017 ला ही कारवी फुलणार असल्याचे सांगितले जाते.
 
काजवा महोत्सव 
घाटघर आणि रतनवाडी परिसरात जूनच्या पंधरवाडय़ात रात्रीच्या वेळी झाडांवर प्रकाशमान झालेली फुले अवतरलेली पहायला मिळतात़ ही फुले म्हणजे असंख्य काजव्यांचे पुंजक़े यालाच या परिसरात काजवा महोत्सव म्हणतात़ हा काजवा महोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य हौशी घाटघर परिसरात टेंट उभारुन राहतात.