राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेने जे भोगले ते आज राष्ट्रवादी भोगत आहे. अजित पवार व शरद पवार यांनी दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांना कोण कोण आमदार उपस्थित आहेत याची यादी आली आहे. अजित पवार यांच्या गटाने ४३ आमदारा सोबत असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार गटाने १३ आमदारा सोबत असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, धर्मराव आत्राम, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, अनिकेत तटकरे, संजय बनसोडे, सुनील शेळके, निलेश लंके, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी (एमएलसी), रामराजे निंबाळकर, दत्ता भरणे, आदिती तटकरे, विक्रम काळे (एमएलसी), धनंजय मुंडे, सुनील विजय टिंगरे, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप, नितीन पवार, इंद्रजीत नाईक, शेखर निकम, राजेश पाटील आदी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आहेत.
तर शरद पवारांच्या बैठकीला १३ आमदार, ३ विधान परिषद आमदार आणि पाच खासदार उपस्थित आहेत. अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार हे आमदार उपस्थित आहेत.
तर खासदारांमध्ये श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा), अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) वंदना चव्हाण (राज्यसभा) हे उपस्थित आहेत. तीन विधानपरिषद सदस्यांमध्ये शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी, एकनाथ खडसे हे उपस्थित आहेत.