नाशिक : महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून ‘सिंहस्थ कुंभमेळा -२०१५ यात्री निवास योजना’ राबविली जात असून, त्याअंतर्गत महामंडळाकडे १८ मिळकतधारकांनी नोंदणी केली आहे. सदनिका, रो-हाऊस, बंगला, तंबू आदी २४७ निवासव्यवस्था त्यामुळे उपलब्ध झाल्या आहेत.कुंभमेळ््यात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक व परदेशी पर्यटक दाखल होतील. त्यांच्या निवास-भोजनाची व्यवस्था होण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार देण्यासाठी निवास योजना जाहीर झाली आहे. निवासाचे दर मिळकत धारकांनीच ठरवायचे आहेत. योजनेत नोंदणीसाठी ३० आॅगस्टपर्यंतची मुदत आहे. निवास व्यवस्थेची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनासह महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)कुंभमेळ्यात स्थानिकांच्या मदतीने निवास व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास रोगराईचा धोका टाळता येऊ शकतो. केवळ वर्षभरासाठी कुंभमेळ््यात ही योजना राबविली जात आहे. - प्रज्ञा बडे-मिसाळ, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन महामंडळ
कुंभमेळ््यासाठी यात्री निवास योजना
By admin | Published: July 30, 2015 3:20 AM