पिंपरी : महावितरणच्या पिंपरी विभागात ९६ हजार ८४२ ग्राहकांनी १६ कोटी ५२ लाख रुपयांचा ‘आॅनलाइन’ भरणा केलेला आहे. पुणे परिमंडळातील मे महिन्यातील हा सर्वाधिक वीज (देयके) बिलभरणा आहे. गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी विभाग आॅनलाइन वीजबिल आॅनलाइन भरण्यात आघाडीवर आहे. शहरासाठी ही भूषणावह बाब आहे. पिंपरी विभागात एकूण ३ लाख ३८ हजार वीजग्राहक आहेत. हिंजवडी, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, प्राधिकरण, चिंचवड, निगडी आदी भागांत सर्वाधिक सुरक्षित ग्राहक आहेत. महावितरणने संकेतस्थळासह मोबाइलधारकांसाठी अॅपद्वारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भात वीज बिलावर माहिती दिली आहे. तसेच, जनजागृती केली जात आहे. वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. वीज बिल भरणा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी रांगेत उभे राहून बिल भरण्यापेक्षा आॅनलाइन काही सेकंदांत बिल भरण्यास पसंती दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रवास व रांगेत उभे राहणे, सुट्या पैशांचा प्रश्नाच्या कटकटीपासून सुटका झाली आहे. व्यस्त जीवनपद्धती आणि नवरा-बायको दोघे नोकरी करीत असल्याने कोणाकडे फावला वेळ नसतो. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातूनच मोबाइलद्वारे बिल भरून मोकळे होतात. त्यामुळे वेळ वाचतो. बिल मुदतीत न भरल्याने वीज कट होण्याचा ताप वाचतो. महावितरणने इंटरनेटद्वारे ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या वेबसाईटवर ‘आॅनलाइन’ बिल भरण्याची सुविधा लघुुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सोबतच महावितरणने आॅगस्ट २०१५ मध्ये स्मार्ट मोबाइलधारकांसाठी अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडिट वा डेबिट कार्ड वा नेटबॅँकिंगद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत ताटकळण्याऐवजी महावितरणच्या वेबसाइट व अॅपवरून बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.महावितरणकडून लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाइन बिल भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तसेच छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट किंवा नेटबॅँकिंगचा पर्याय उपलब्ध असून, वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह बिल आॅनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या बिलाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.(प्रतिनिधी)>ग्राहकांना एसएसएमद्वारे संदेशगेल्या वर्षीपासून पिंपरी विभागात आॅनलाइन वीज बिलभरणा सर्वाधिक होत आहे. बिल भरले नसल्यास ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएस पाठविला जातो. त्यामुळे ग्राहक जागृत होऊन त्वरित आॅनलाइन भरणा करून मोकळा होतो. तसेच, आॅनलाइन बिल भरण्यासंदर्भात परिसरात जनजागृती केली जात आहे. या परिसरात सर्वाधिक सुरक्षित भाग आहे. तसेच, आयटी पार्कचे अभियंते मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. त्यामुळे आॅनलाइन बिल भरण्यास पसंती दिली जात आहे, असे पिंपरी विभागाने सांगितले. >भोसरी विभागातून १२ कोटी ४० लाखांचा भरणापुणे परिमंडलात आॅनलाइन भरणा १०९ कोटी रुपयांवर गेला आहे. एकूण पाच लाख ग्राहक गेल्या पाच वर्षांत वीजदेयकांच्या आॅनलाइन भरण्यात प्रथमच १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गणेशखिंड मंडलातील पिंपरीतील एकूण ९६ हजार ८४२ ग्राहकांनी आॅनलाइन वीज बिल भरले. याद्वारे सर्वाधिक १६ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले. भोसरी विभागात ४८ हजार १७१ ग्राहकांनी १२ कोटी ४० लाख रुपये भरणा झाला आहे. गणेशखिंड मंडलमधील आॅनलाइन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या मे महिन्यात २ लाख ५५ हजारांवर गेली असून, त्यांनी ५५ कोटी ५० लाखांचा बिलभरणा केला आहे. शिवाजीनगर विभागात ५४ हजार ३२० ग्राहकांनी १४ कोटी ८४ लाख रुपये व कोथरूड विभागात ५५ हजार ६०५ वीजग्राहकांनी ११ कोटी ७४ लाख रुपयांच्या देयकांचा आॅनलाइन भरणा केला आहे.
‘आॅनलाइन’मध्ये पिंपरी अव्वल
By admin | Published: June 28, 2016 1:47 AM