'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:41 PM2019-07-20T16:41:48+5:302019-07-20T16:42:05+5:30

धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

pitch has made for NCP in Akole constituency Madhukar pichad, Vaibhav Pichad | 'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार

'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार

Next

मुंबई - राज्यभरातील अनेक नेत्यांची पक्षांतरे सुरू असून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी आघाडीचे अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परंतु, अनेक संभाव्य उमेदवारांनी आणि विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी लोकसभा निवडणुकीतच केल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत मुधकर पिचड आणि वैभव पिचड या पिता-पुत्रांनी अकोले मतदार संघातून आघाडीच्या उमेदावाराला मताधिक्य मिळवून देत आपली पत कायम राखली. तसेच विधानसभेसाठी मैदानही तयार केले.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने अभूतपूर्व यश मिळवले. अनेक विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली. परंतु, अकोले मतदार संघात ती कामगिरी करण्यात युतीला अपयश आले. वास्तविक पाहता, अकोले विधानसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली होती. यावेळी मात्र येथील मतदारांना भाजप-शिवसेना युतीला डावलल्याचे दिसून आले. यामध्ये वैभव पिचड यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

२०१४ मध्ये शिवसेनेला या मतदार संघातून ४ हजार ५११ मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी गटतट विसरून काम केले. मात्र शिवसेनेला आघाडी मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना अकोले तालुक्याने ३१ हजार ६५१ मतांची आघाडी दिली. यासाठी पिचड पिता-पुत्रांनी विधानसभेची नांदी समजून प्रचार केला. सहाजिकच काँग्रेसला अकोले मतदार संघातून आघाडी मिळाल्यामुळे राष्ट्रवादीसाठी विधासभेचं मैदान तयार झाले आहे.

या मतदार संघात धनगर आरक्षणाचा मुद्दा आघाडीच्या पथ्यावर पडला. धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: pitch has made for NCP in Akole constituency Madhukar pichad, Vaibhav Pichad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.