शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

पितृभक्ती : जळगावात वडिलांच्या साहित्याचे मृत्यूपश्चात प्रकाशन

By admin | Published: September 28, 2016 11:01 PM

भगवत गितेवरील वडिलांनी तयार केलेले सहज व सोप्या भाषेतील ‘गीतामृत’ या पुस्तकाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशन करीत पितृभक्तीचा प्रत्यय दिला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 28 : श्रीमद भगवत गितेवरील वडिलांनी तयार केलेले सहज व सोप्या भाषेतील ‘गीतामृत’ या पुस्तकाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशन करीत पितृभक्तीचा प्रत्यय दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांचे वडील दामोदर पांडुरंग बोरोले यांचे ९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. सेवानिवृत्त साहाय्यक निबंधक असलेले दामोदर बोरोले हे धार्मिक प्रवृत्तीचे होते.

श्रीमद् भगवद्गीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास करून त्यांनी तो सहज व सोप्या भाषेत सर्वसामान्याना समजेल असा लिहून ठेवला होता. वडिलांच्या निधनानंतर प्रमोद बोरोले यांनी त्यांच्याशी संबधित कागदपत्रे पाहिली. त्यात गीतेवरील हस्तलिखित मिळून आले. प्रमोद बोरोले यांनी हे हस्तलिखित आपल्या परिचित असलेल्या दोन ते तीन जणांना वाचण्यासाठी देऊन पुस्तक तयार करता येईल का? अशी विचारणा केली. सर्वसामान्य व्यक्तीला सहज आणि सोप्या भाषेत समजेल असे हे लिखाण असल्याने पुस्तक तयार करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली. त्यानुसार प्रमोद बोरोले यांनी ‘गीतामृत’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती तयार केली.

बुधवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वडिलांच्या प्रेमापोटी हे पुस्तक तयार केल्यामुळे त्याची विक्री न करता बोरोले यांनी प्रकाशित केलेल्या एक हजार प्रती वडिलांचे मित्र, वारकरी ग्रुप, गजानन महाराज सत्संग ग्रुपमधील सदस्यांना हे पुस्तक मोफत भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रकाशनावेळी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होेते.