शहरं
Join us  
Trending Stories
1
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
2
नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती
3
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
4
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
5
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
6
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
7
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
8
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
9
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
10
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
11
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
12
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
13
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
14
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
15
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
16
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
17
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
18
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
19
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
20
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

‘पीके’चा खास ‘शो’ अडचणीत

By admin | Published: November 10, 2014 4:01 AM

संजय दत्तच्या मैत्रीखातर येरवडा कारागृहात ‘पीके’चा खास शो आयोजित करण्याच्या प्रयत्नाला राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी चांगलाच खो दिला आहे

पुणे : संजय दत्तच्या मैत्रीखातर येरवडा कारागृहात ‘पीके’चा खास शो आयोजित करण्याच्या प्रयत्नाला राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी चांगलाच खो दिला आहे. कारागृहात चित्रपटाचा शो करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य आमीरने रविवारी दुपारी नोएडामध्ये (उत्तर प्रदेश) केले. त्यावर येथे कोणीही स्पेशल नाही, सगळे कैदी सारखेच आहेत, अशा शब्दांत मीरा बोरवणकर यांनी खडसावल्यामुळे आमीरला चांगलाच झटका बसला आहे.‘पीके’ या चित्रपटात आमीरची मुख्य भूमिका असून, संजय दत्तने त्याच्या मित्राची भूमिका केली आहे. पडद्यावरील ही मैत्री प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमीर प्रयत्न करीत आहे. संजयसोबतचा त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे आपण संजय दत्तसाठी खास ‘स्क्रिनिंग’ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.संजय दत्तसोबत काम करताना सुरक्षिततेची आणि निवांतपणाची भावना होती. तो आपल्याला मोठ्या भावासारखा आहे. सेटवर घालविलेला वेळ खूपच छान होता. त्याच्यातील माणुसकी आणि प्रेमभावाबद्दल आदर आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव संस्मरणीय होता, असेही आमीर म्हणाला होता. यासंदर्भात बोरवणकर यांची प्रतिक्रिया विचारली असता, आमच्यासाठी कोणीही विशेष व्यक्ती नाही. सगळे कैदी एकसमान आहेत. कोणालाही आम्ही खास वागणूक देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आमीरच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, तसेच संजय दत्तसाठी विशेष ‘शो’चे आयोजन केले जाते का, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)