मुंबई : खबरदारीच्या उपाययोजनांनंतरही यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आह़े गेल्या दोन दिवसांच्या पावसात पाणी तुंबण्याची 16 नवीन ठिकाणं आढळून आली आहेत़ त्यामुळे ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प, पजर्न्य जलवाहिन्यांच्या दजर्ाेन्नतीवर उडविलेले कोटय़वधी रुपये पाण्यात गेल्याचे उघड झाले आह़े
मुंबईत 129 ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे पावसाळीपूर्व सव्रेक्षणात आढळून आले होत़े मात्र यंदाच्या पावसाळ्यात या यादीमध्ये आणखी काही ठिकाणांची भर पडली आह़े यामध्ये व्ही़एम़ रोड जंक्शन, अंधेरी, मैत्री पार्क, गोरेगाव, सफेद पूल, कुर्ला, जुहू बस डेपो, इराणीवाडी, बहार जंक्शन या ठिकाणांचा समावेश आह़े स्थानिक परिसरात बांधलेल्या भिंतींनी तसेच अतिक्रमण हे या ठिकाणी पाणी तुंबण्याचे कारण असल्याचा बचाव पालिका अधिकारी करीत आहेत़
याबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, व्ही़एम़ जंक्शन येथे नाल्याजवळ भिंत बांधण्यात आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला, तर पजर्न्य जलवाहिन्या तुंबल्यामुळे मैत्री पार्क येथे पाणी तुंबल़े तसेच सफेद पूल येथे पाणी तुंबण्यास झोपडय़ांचे अतिक्रमण कारणीभूत ठरले, असे एका अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)
च्नव्याने पाणी तुंबलेल्या ठिकाणांची यादी तयार करून त्याची माहिती घेण्यात येत आह़े यामध्ये त्या परिसराची माहिती, पाणी तुंबण्याचा कालावधी आदी माहिती घेण्यात येणार आह़े
च्या ठिकाणी पाणी तुंबण्याचे कारण काय, याची कारणमीमांसा जाणून घेण्याचे आदेश अधिका:यांना देण्यात आले आहेत़ यामध्ये दोषी आढळलेल्या ठेकेदार व अधिका:यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने स्पष्ट केल़े
कोटय़वधी रुपये पाण्यात
1ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पजर्न्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आल़े
2मात्र पालिकेच्या ढिसाळ व संथ कारभारामुळे या प्रकल्पाचा खर्च दीड हजार कोटींवरून आता चार हजार कोटींवर पोहोचला आह़े
3पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिकेने 172 पंप बसविले आहेत़ मात्र हे पंप चालत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
सहा दिवस जरा सांभाळून
च्समुद्रात 4़5 मीटर्स उंचीच्या मोठय़ा लाटा उसळत असल्यास पावसाळ्यात पाणी तुंबत़े
च्आज दुपारी मोठी भरती असल्याने हीच अवस्था झाली़ पुढचे पाच दिवसही दुपारच्या वेळेत समुद्रात मोठय़ा लाटा उसळणार आहेत़
च्त्यामुळे पुढील सहा दिवस मुंबईकरांना सांभाळून राहावे लागणार आह़े
मोठय़ा भरतीची वेळ व लाटांची उंची (जुलै महिना)
तारीखवेळलाटांची उंची (मीटर)
12दु़ 12़124़63
13दु़ 12़584़83
14दु़ 1़444़95
15दु़ 2़284़95
16दु़ 3़134़83
17 दु़ 4़क्क्4़58