शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

प्रार्थना स्थळे ‘अनलॉक’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 5:28 AM

भाविकांची गर्दी, राज्यात ठिकठिकाणी पहाटेपासून रांगा

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून उघडण्यात आली आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि हाजी अली दर्ग्यासारख्या प्रार्थना स्थळांवर भाविकांची गर्दी  दिसून आली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरचे  विठ्ठुल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनाची आस लावून बसलेल्या भाविकांनी भल्या पहाटे रांगा लावल्या होत्या. हाजी अली दर्ग्यावरही हीच स्थिती होती. सिद्धिविनायक मंदिरात दररोज एक हजार भाविकांना दर्शनाची परवानगी असेल. सर्वांना टप्प्याटप्प्याने दर्शनाची मुभा  दिली जाईल. मोबाईल ॲपवरून दर्शनासाठी बुकिंग करता येईल, असे या मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.सिद्धिविनायक मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असून भाविकांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतरच दर तासाला शंभर भाविकांना दर्शनासाठी आत सोडले जात आहे. हात स्वच्छ करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोविडमुक्त क्षेत्रातच परवानगीवर भर...सरकारने जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेनुसार (एसओपी) कोविडमुक्त क्षेत्रातील धार्मिक स्थळे उघडण्यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे पालन करीत भाविकांना मंदिरांमध्ये दर्शनाची परवानगी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत शनिवारी धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा राक्षस अजूनही अस्तित्वात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

टॅग्स :TempleमंदिरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक