गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी केवळ भारतीय म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सचे आवाज येतील असा कायदा आणण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. नाशिक येथे एका महामार्गाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांमध्ये वापरण्यात येत असलेल्या सायरनचाही विचार केला जात आणि ते आकाशवाणीवर वाजणाऱ्या मधूर धूनमध्ये बदलण्याचा अभ्यास केला जात असल्याचंही ते म्हणाले.
"आता लाल दिव्याची प्रथा बंद झाली आहे. आता मला हा सायरनही बंद करायचा आहे. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांना असलेल्या सायरन बाबात अभ्यास करण्यात येत आहे. एका कलाकारानं आकाशवाणीसाठी एक धून तयार केली आहे आणि ती सकाळी चालवण्यात आली. मी ती धून रुग्णवाहिकेसाठी वापरण्याच्या विचारात आहे, जेणेकरून लोकांनाही त्याची समस्या होणार नाही. विशेषत: मंत्र्यांच्या गाड्या बाजूनं जाताना जो जोरदार आवाज होतो तो अतिशय त्रासदायक असतो, यामुळे कानांनाही त्रास होतो," असं गडकरी म्हणाले.
मुंबई-दिल्ली महामार्गाचं काम सुरू"एक लाख कोटी रूपयांचा मुंबई-दिल्ली महामार्गाचं काम यापूर्वीच हाती घेण्यात आलं आहे. परंतु हा महामार्ग भिवंडीवरून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईपर्यंत पोहोचलो. वसई खाडीवरही एका महामार्गाचं काम सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलं. "सध्या आम्ही वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा एक पूल उभारण्याची योडना आखत आहोत. त्यानंतर नरीमन पॉईंटपासून दिल्लीरम्यान अंतर कापण्यास १२ तास लागतील. तसंच यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर येणारा ताणही कमी होईल," असं गडकरी म्हणाले.