शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

ग्रहदिशेचा अभ्यासक कोपर्निकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 4:28 AM

मागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत.

- अरविंद परांजपेमागच्या अंकात आपण बघितले होते की, आपल्या पूर्वजांनी विश्वाची कल्पना करताना कशाप्रकारे विचार केला होता. त्यांनी असा विचार मांडला की, पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती एक मोठा गोल फिरत आहे. या गोलावर आतून तारे चिकटवले आहेत. त्यांची संख्या सुमारे ६००० आहे. या गोलाचा अर्धा भाग पृथ्वीच्या क्षितिजावर तर अर्धा भाग तिच्या खाली असतो. म्हणून एका वेळेस आपल्याला सुमारे ३००० तारे दिसू शकतात. हा गोल पृथ्वी भोवती फिरत असल्यामुळे आपल्याला ताºयांचा उदय आणि अस्त होताना दिसतो आणि हे तारे त्या गोलावर अंकित असल्यामुळे त्यांना काल्पनिक रेषांनी जोडून त्यांच्यात वेगवेगळ्या आकृतींची कल्पना करता येते. या गोलाला आपण भूगोल म्हणून ओळखतो. तर इंग्रजीत याला सेलेस्टीयल स्फियर असे म्हणतात. अनेकदा याला आपण नभपटलही म्हणतो.या ६००० ताºयांच्या शिवाय पाच तारे असे ही होते की, ज्यांची जागा इतर ताºयांच्या सापेक्षात बदलत असताना दिसून येत. अस वाटे की, हे तारे या गोलावर स्वच्छंदपणे नभपटलावर भटकत आहेत. ग्रीक लोकांनी त्याच्या भाषेत यांना प्लॅनेट (म्हणजचे भटके) म्हटले. यांना आपण ग्रह म्हणून ओळखले. याशिवाय या गोलावर चंद्र आणि सूर्यही आहेत, ज्यांची जागापण बदलत असते. कालांतराने आणखीन दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे नभपटलावर सूर्य मात्र एका विशिष्ट मार्गानेच प्रवास करतो. तर चंद्राचा आणि इतर ग्रहांचा मार्ग सूर्याच्या मार्गाच्या जवळपासच असतो. या सर्वांचा नभपटलावर प्रवास दाखवण्याकरिता मग अशी कल्पना मांडण्यात आली की, पृथ्वी आणि भूगोल यांच्यामध्ये ग्रहांचे पाच, चंद्र्राचा आणि सूर्याचा एक-एक असे सात अत्यंत पारदर्शक स्फटिकांचे गोल आहेत. हे गोल इतके पारदर्शक आहेत की, त्याचे अस्तित्व आपल्याला दिसत नाही. या गोलांची फिरण्याची गती वेगवेगळी असल्याने ग्रह वेगवेगळ्या गतीने नभपटलावर प्रवास करताना दिसतात.आज आपल्याला वाटू शकते की, त्या काळात लोकांच्या विश्वाबद्दलच्या कल्पना खूप भन्नाट होत्या. तरीही त्या काळाचा विचार करता त्यांच्या कल्पनेतील विश्व चुकीचे होते, असे मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यांना ग्रहांच्या प्रवासाचा मार्ग गणिताने बºयापैकी सोडवता येत होता; पण यात एक वेगळीच अडचण समोर येत होती. ही अडचण अशी होती की, नभपटलावर प्रवास करता करता ग्रह आपल्या प्रवासाची दिशा बदलून विरुद्ध दिशेने प्रवास करत होते. यालाच आपण ग्रह वक्री आला, असे म्हणतो. हे ग्रह कधी उजवीकडून तर कधी डावीकडून दिशा बदलतात. मग काही दिवसांनी परत फिरून ते आपला पूर्ववत प्रवास सुरू करायचे. हे सर्व स्फटिक गोलांच्या फिरण्यातून दाखवणे, खूपच कठीण होते. हा स्फटिक गोल आधी थांबवायचा, मग तो उलटा फिरवायचा, मग परत सुलटा फिरवायचा, हे सर्व काम सोपे अजिबात नव्हते, कारण ते अभ्यासक हाडाचे शास्त्रज्ञ होते. गोलांना सरळ आणि वक्री फिरवणारी ही दैवी शक्ती आहे, अश्ी पळवाट शोधली नाही.ग्रहांची दिशा का व कशी बदलते, हे दाखविण्याकरिता अनेक गणिते मांडण्यात आली आणि सोडविण्यात आली. ही गणिते अत्यंत किचकट तर होतीच; पण त्याचबरोबर ग्रहांचे मार्ग अचूक सोडवण्यास असक्षम होती.१५व्या शतकातील गणितज्ञ शास्त्रज्ञ कोपर्निकसने (१९ फेब्रुवारी १४७३ - २४ मे १५४३ ) एक गृहीत मांडले. थोडक्यात ते असे होते. समजा आपण मानले की, ग्रह पृथ्वी भोवती न फिरता सूर्याभोवती फिरत आहेत. तर ग्रहांचे वक्री जाणे हे आपण सहज दाखवू शकतो. म्हणजे असे की, एक क्षण समजा की तुम्ही मेरी गो राउंडवर बसून फेरी मारत आहात. एका फेरीत बाहेर उभा असलेला तुमचा मित्र दूरच्या घरांच्या सापेक्षात पुढे-मागे जाताना तुम्हाला दिसून येईल. त्याच्या या गृहिताचे काय पडसाद उमटतील, याची कोपर्निकसला पुरेपूर कल्पना होती. याचा सरळ सरळ अर्थ होतो की, विश्वाचे केंद्र हे पृथ्वी नसून सूर्य आहे. जे पोपला मान्य होणे शक्य तर नव्हतेच; पण असे विचार मांडल्याबद्दल कोपर्निकसला मोठी शिक्षाही झाली असती. कोपर्निकसने एका ग्रंथात आपल्या गृहितांची कारणमिमांसा केली होती. त्याने आपला ग्रंथ फक्त काही जवळच्या विद्वान मित्रांनाच दाखवला होता; पण प्रसिद्ध केला नव्हता. तो मृत्युशय्येवर असताना त्याने आपल्या मित्रांना तो ग्रंथ प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली.असे म्हणतात की, २४ मे १५४३ रोजी त्याच्या मित्रांनी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाची प्रत त्याला दाखवायला आणली, तेव्हा कोपर्निकस कोमात होता; पण तो काही काळ कोमामधून बाहेर आला. त्याने तो ग्रंथ डोळे भरून बघितला आणि हा अमूल्य ठेवा आणि एक संपूर्ण नवीन विचार जगासाठी ठेवून तो कायमचा निघून गेला.(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)paranjpye.arvind@gmail.com

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान