- श्रीकिशन काळे पुणे : आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी पहिल्यांदाच बीड येथे पहिले वृक्षप्रेमी संमेलन घेत आहेत. त्याच्या नियोजनासाठी पुण्यात नुकतीच बैठक झाली. या संमेलनाविषयी लोकमत ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद... ========================================प्रश्न : पहिले वृक्षप्रेमी संमेलन बीडमध्ये घेणार आहात, त्यामागील संकल्पना काय ? - आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत दिली जात आहे. आपण बँकेत पैसे ठेवतो. परंतु त्या पैशांपेक्षा अधिक फायदा वृक्ष आपल्याला देतात. त्यामुळे हे माझ्या ध्यानात आले आणि अगोदर स्वत: काम करायचे ठरवले. फक्त घरात बसून किंवा उपदेश करून निसर्गप्रेमी होता येत नाही, तर प्रत्यक्ष काम करायला हवे. त्यातून मग मी उजाड असलेले बीड येथील पालवन हे ठिकाण निवडले. तिथे लाखभर झाडं लावली आणि आता ते सर्वांनी पहावीत, यासाठी पहिले वृक्षप्रेमी संमेलन घ्यायचे ठरवले. येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार आहोत. प्रश्न : संमेलनाची रूपरेषा कशी असेल ? - बीड जिल्ह्यातील पालवन येथे मी गेल्या काही वर्षांमध्ये लाखभर झाडे लावली आहेत. तिथे पूर्वी सर्व उजाड होते. आता हिरवाई आहे. ते लोकांना दाखवायचे आहे. तिथे राँक गार्डन करत आहोत. येथे भरविण्यात येणाºया संमेलनासाठी आम्ही विद्यार्थ्यांना बोलावणार आहोत. ते येतील आणि इथला निसर्ग पाहतील. संमेलनात भाषणबाजी नसेल. निसर्ग शिक्षण देणारे स्टाँल्स असतील. प्रत्येक स्टाँलवर विद्यार्थी जाऊन निसगार्ची माहिती घेतील. वृक्षसंमेलनासारखेच वृक्ष दिंडी, वृक्ष शाळा, वृक्ष जत्रा असे उपक्रम देखील असतील. प्रश्न : सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण काम करताय. पालवन येथील उपक्रमाला प्रतिसाद कसा आहे ? - सध्या काही लोकं स्वखचार्ने काम करत आहेत. खूप थोडी लोक सोबत आहेत. सहभाग अधिक वाढला पाहिजे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात असे संमेलन घेणार आहोत. स्थानिक नागरिक, राजकीय लोक, उद्योजक आदींनी यात सहभागी होऊन ही निसगासार्ठीची चळवळ वाढवायला हवी. प्रत्येकाने पाच झाडं लावून ती वाढवली पाहिजेत. त्या झाडांची गोष्ट इतरांना सांगितली पाहिजे. ज्याच्याकडे जास्त झाडं तो सर्वात श्रीमंत मानला पाहिजे. * वृक्ष संमेलनासोबत विविध उपक्रम घेत आहात, त्या विषयी सांगा? - झाड आपल्याला जगवतात. त्यामुळे आता प्रत्येक रूग्णालयात बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना रोप दिलं पाहिजे. हे रोप देशी हवे. बोर, वड, पिंपळ, काटेसावर, कडूनिंब अशी रोपं द्यायला हवी. बाळाबरोबर त्या रोपाला वाढवलं पाहिजे. ते बाळ मोठं झाल्यावर इतरांनाही झाडाची गोष्ट सांगू शकेल. प्रत्येक शाळेत देखील विद्याथ्यार्चे एक झाड असले पाहिजे. त्या विद्याथ्यार्ने ते झाड वाढवलं पाहिजे. मग सर्व परिसर हिरवाईने नटून जाईल. शाळांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. * वाढदिवसाला झाड लावा, या उपक्रमाची सुरवात कशी झाली ? - आई हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. मी राजा असलो, तरी तिला मरणापासून वाचवू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते आणि वाढवते. पण आईनंतर आपल्याला झाडच जगवते. त्यामुळे आपण झाडांना जगवलं पाहिजे. झाडं लावली पाहिजेत. मी माझ्या आईच्या वाढदिवसाला बियांची तुला केली. तिच्या वजनाएवढ्या बिया रूजविण्याचा संकल्प केला आणि आईला सांगितले की, तू आता या झाडांच्या रूपात आयुष्यभर सोबत असशील. झाडांच्या पानांमधील आवाजातून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, फुलांच्या सुगंधातून, फळांतून तू मला भेटत राहशील. या निसर्गाच्या फुलण्यातून तुझं हसणं मला दिसेल. जिथे बी रूजेल तिथे तुझं रूप मला दिसेल. म्हणून प्रत्येकाने वाढदिवसी झाडं लावून या धरणीमातेला हिरवाईने नटवायला हवे. ====================सध्या आमचा नारा हा 'येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण, आमचा एकच पक्ष, तो म्हणजे वृक्ष, लिंबाच्या नावाने चांगभलं अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या तोंडी आल्या की, जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही. झाड आपल्याला ऊर्जा देते, आँक्सिजन देते. जगण्याचे बळ देते. त्यासाठी झाडे जगली पाहिजेत.- सयाजी शिंदे, अभिनेते आणि वृक्षप्रेमी संमेलनाचे संयोजक
एक लावा आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ! अभिनेते सयाजी शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 6:00 AM
आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत
ठळक मुद्देपहिले वृक्षप्रेमी संमेलन भरविणार; राज्यभर चळवळ वाढवणार येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार