वाकड : येथील श्वास सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत असून, पिंक सिटी रस्त्यावर वृक्षारोपण करून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. महिन्याभरात वाकडमधील अंतर्गत रस्त्यावर फाउंडेशनच्या वतीने एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात झाडे रुजतात व जगतात, हे लक्षात घेत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. फाउंडेशनचे संस्थापक रणजीत कलाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात झाली. या वेळी संतोष कलाटे, उद्योजक सचिन गवारे, अक्षय मानकर, कुणाल रमगनौर, विशाल शेडगे, अतुल शेडगे, संदीप गवारे, मोबीन पठाण, नचिकेत कलाटे, सोहेल शेख यांच्यसह सदस्य उपस्थित होते. येत्या महिन्याभरात अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा कडुनिंब, अशोका, आंबा, वड, पिंपळ, नारळ, शेवरी, फणस, चिंच अशा विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाकड पिंक सिटी रस्त्यावर ५० झाडे लावण्यात आली. (वार्ताहर)
पिंक सिटी भागामध्ये तरुणांकडून वृक्षारोपण
By admin | Published: May 18, 2016 1:47 AM