पुणो : अंधo्रद्धेविरोधात आयुष्य वेचणा:या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लावताना तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅन्चेट’चा विधी करून मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या पाश्र्वभूमीवर असा प्रकार झाला असेल तर ते खूपच धक्कादायक असून, यातील तथ्य शोधून काढण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंधo्रद्धा निमरूलन समितीच्या पदाधिका:यांकडून केली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या मारेक:यांचा शोध लावण्यासाठी गुलाबराव पोळ यांनी एका निवृत्त हवालदाराच्या मदतीने ‘प्लॅन्चेट’चा विधी केला. त्याची माहिती खुद्द पोळ यांनीच दिल्याचा दावा एका नियतकालिकेत करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, गुलाबराव पोळ यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्री व पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याची विभागीय चौकशी करावी. डॉक्टरांनी 4क् वष्रे अंधo्रद्धेविरोधात काम केले, त्यांच्या खुनाचा तपास करणारे अधिकारी असा प्रकार करत असतील तर अत्यंत धक्कादायक आहे.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘‘गुलाबराव पोळ यांच्यावरील आरोप खरे असतील तर अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भूत, भानामती, प्लॅन्चेट अशा प्रकारांविरुद्ध दाभोलकरांनी चळवळ चालविली. उच्च पदस्थ पोलीस अधिकारी जर असे प्रकार करीत असतील तर ते संविधानाच्या मूल्यांशी प्रतारणाच करीत आहेत, असे म्हणावे लागेल. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी घटनेनुसारच काम करणो आवश्यक आहे. अधिका:यांच्या वैयक्तिक o्रद्धेचा यात भाग येत नाही. घटनेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी अवलंबणो गरजेच आहे. (प्रतिनिधी)
अधिका:यांचा प्रशिक्षणात समावेश व्हावा
उच्च पदस्थ अधिका:यांना प्रशिक्षण देताना तांत्रिक शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक अंगानेही प्रशिक्षण दिले जाणो आवश्यक आहे. त्यामध्ये अधिका:यांकडून अतार्किक वर्तन होणार नाही, याकरिता विशेष अभ्यासक्रम तयार करून त्याचा त्यांच्या प्रशिक्षणात समावेश व्हावा, अशी अपेक्षा अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ़ दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपासासाठी जादूटोण्याचा आधार घेतल्याचे सांगितले जात आह़े, ते चुकीचे आह़े संबंधितांवर नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले.