ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २६ - मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाच्या भिंतीला झाडा-झुडपांनी वेढले असल्याने भितीला तडे जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
पाटबंधारे विभागाच्यावतिेने मालेगाव तालुक्यात अडोळ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र या प्रकल्पाकडे व्यवस्थित लक्ष नसल्याने भिंतीवर झाडे-झुडपांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असतांना त्याला काढण्यात आले नाही. अनेकदा कालव्याचे गेट उघडे राहिल्याने प्रकल्पातील पाणी वाहून गेले. आधिच मालेगाव तालुक्यात कमी पाऊस त्यातही गेट उघडे राहिल्याने या प्रकल्पात केवळ २२ ते २५ टक्केच पावसाची साठवण झालेली आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.