मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू होताच मुंबईसह ठाणे जिल्ह्यात महापालिकांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात शेकडो किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आणि अडीच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. मुंबईत शनिवारी, रविवारी सुटीचा माहोल असल्याने सोमवारपासून कारवाईचा धडाका लावला जाईल, अशा भ्रमात असलेल्या आस्थापना आणि व्यापाऱ्यांना पालिकेने रात्रीदणका दिला आणि वांद्रे येथील सिलेरिया, स्टार बक, फूड हॉल आणि मॅकडोनाल्डमध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नियमानुसार या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी प्रत्येकी पाच हजारांचा दंड भरला.ठाणे जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी हजारो किलो प्लॅस्टिक जप्त करून साधारण सव्वा दोन लाखांहून अधिक दंड वसूल केला.ठाणे पालिकेने १०० पेक्षा जास्त आस्थापनांवर बडगा उगारून ९५ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल केला. या कारवाईत २५०० किलो प्लॅस्टिक जप्त झाले. कल्याण-डोंबिवली पालिकेने १० किलो प्लॅस्टिक जप्त करत ५० हजारांचा दंड वसूल केला. अंबरनाथ नगरपालिकेने १० दुकानदारांवर कारवाई केली. भिवंडीत सहा दुकानदारांकडून ३१ हजार ५०० रूपये वसूल करण्यात आले. मीरा-भार्इंदरमध्ये ९० किलो प्लॅस्टिक, ६० किलो थर्माकोल जप्त करण्यात आले. तेथे २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.राज्यात प्लॅस्टिक बंदीला सुरूवात झाल्याने बहुतेक विक्रेते आणि दुकानदारांनी दंडाची धास्ती घेत प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार केल्याचे चित्र शनिवारी दिसले. अंमलबजावणीच्या या पहिल्या दिवशी मुंबई महापालिकेने दुपारपर्यंत कारवाईऐवजी जनजागृतीचा मार्ग निवडल्याने सर्वसामान्य मुंबईकर मात्र निर्धास्तपणे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसले.सर्वसामान्य नागरिकावर कारवाईचा बडगा उगारण्याआधी दुकानदार, फेरीवाले, विक्रेते, मॉलवर कारवाई करणार असल्याचे वक्तव्य पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले होते. त्यामुळे बंदीच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने मुंबईकर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसले. सुरूवातीला पाच हजार, १० हजार आणि २५ हजार रुपये दंडासह तीन महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. या कारवाईच्या भीतीपोटी बहुतेक दुकानदारांनी, मॉल, सुपरमार्केटनी शनिवारी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर सुरू केल्याचे चित्र दिसले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयासह रूग्णालये, शाळा आणि कार्यालयांबाहेर प्लॅस्टिक संकलनास सुरूवात केली होती. पालिकेच्या शाळा, रूग्णालये, कार्यालयांमध्ये येणाºया कर्मचाºयांसह पालक, रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिकांत प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृतीचे काम त्यांनी केले. प्लॅस्टिकच्या दुष्परिणांसह यापुढे प्लॅस्टिकचा वापर केल्यास होणाºया दंडाबाबतही सुरक्षा रक्षक माहिती देत होते. त्यामुळे दुपारपर्यंत पालिकेच्या मुख्यालयासह केईएमसारख्या रुग्णालयांबाहेर प्लॅस्टिक पिशव्यांचा ढीग जमा झाला होता. पालिकेने प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी मुंबईत सुरू केलेल्या ३७ संकलन केंद्रांसह विविध ठिकाणी गोळा झालेल्या प्लॅस्टिकचा आकडा संध्याकाळी १५० मेट्रिक टनांहून अधिक झाला.नवी मुंबई,पनवेलमध्येही कारवाईनवी मुंबई : नवी मुंबई परिसरात पालिकेने सात जणांवर कारवाई करून ३५ हजारांचा दंड वसूल केला. पनवेल परिसरात एका शाळेतील कँटीनमधून प्लॅस्टिकचा साठा जप्त करून त्यांना दंड करण्यात आला. सीबीडीत सत्यम वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली.४ जूनला पालिकेने ठिकठिकाणी छापे टाकून टाकून नऊ टन प्लॅस्टिक पिशव्या व वस्तुंचा साठा जप्त करत १५ लाखांचा दंड वसूल केला होता.लॅस्टिकविरोधी मोहीम सोमवारपासून अधिक तीव्र करण्यात येणार आहे़धडक कारवाई सोमवारपासूनराज्यात प्लॅस्टिक बंदीअंतर्गत शनिवारपासून छापासत्र सुरू झाले असले, तरी मुंबईत जनजागृतीवर भर आहे. मुंबईत शनिवारी रात्री कारवाई झाली. तशीच ती रविवारीही होण्याची शक्यता आहे. मात्र शहरासह उपनगरात सोमवारपासून धडक कारवाई, छापेसत्र सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यात नांदेड, बीड वगळता सर्व जिल्ह्यांत बंदीचा फज्जा उडाला. बीडमध्ये १५ विक्रेत्यांवर कारवाई केली. नांदेडला ४ दुकानदारांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड झाला. खान्देशात कारवाई नाहीखान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवशी कोणतीही कारवाई झाली नाही. अंबांनीनी स्टीलच्या डब्यातून मागविले पार्सलरिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींसाठी दररोज मुंबईतील माटुंगामधील कॅफे म्हैसूर येथून इडली, सांबार-चटणीचे पार्सल जाते. प्लॅस्टिक बंदीमुळे त्यांच्या घरुनच स्टीलचे डबे हॉटेलमध्ये न्यावे लागले.राज्यभरातील कारवाईशहर दंड (रुपये)मुंबई १५,०००ठाणे ९५,०००कल्याण-डोंबिवली ५०,०००भिवंडी ३१,५००मीरा भार्इंदर २०,०००पुणे ३,६९०००नाशिक २,१५000सोलापूर २,१५000नागपूर २,५५000अमरावती ३५,०००कोल्हापूर ४५,०००सांगली १,०००००सातारा २५,०००नांदेड २०,०००अहमदनगर १,५००
Plastic Ban : पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगा, लाखोंचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 6:21 AM