शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
3
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
4
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
5
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
6
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
7
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
8
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
9
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
10
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
11
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
12
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
13
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
14
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
15
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
16
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
17
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
18
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
19
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
20
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

प्लास्टीकमुक्ती दिखाव्यापुरतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 3:05 AM

पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पालिकेचे प्लास्टीकमुक्ती अभियान दिखाव्यापुरतेच असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहरात रोज तब्बल ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकचा वापर सर्रास सुरू असून मॉलपासून दुकानदारांपर्यंत शुल्क न आकारता प्लास्टीक पिशव्या दिल्या जात आहेत. प्लास्टीकमुक्तीचे आदेश धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये चांगले काम सुरू असल्याचा दिखावा करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला पण एकही ठिकाण फेरीवालामुक्त करता आलेले नाही. ८ हजार अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या पण सर्वच्या सर्व पुन्हा सुरू झाल्या. ओला व सुका कचरा, पाण्याचा अपव्यय थांबविण्याचे अभियानही फसले आहेत. कायमस्वरूपी यंत्रणा बसविण्यापेक्षा दिखावेगिरीचे काम सुरू झाले असून त्यामध्ये आता प्लास्टीकमुक्त नवी मुंबई अभियानाची भर पडली आहे. पालिकेने ८ जानेवारीला शंकर महादेवन, जुही चावला व अनेक चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीमध्ये प्लास्टीकमुक्त अभियान राबविण्यात आले. विद्यार्थी, सामाजिक संस्थांच्या मदतीने २४ मेट्रिक टन प्लास्टीक गोळा केले. गोळा केलेले प्लास्टीक तुर्भे डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आले. तेथे डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे बनविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. पण प्रत्यक्षात प्लास्टीक दाणे बनविण्याचा प्रकल्प पालिकेकडे नाही. प्लास्टीकचा पुनर्वापर करण्याची काहीच यंत्रणा नाही. यामुळे जमा झालेल्या कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या कारखान्याला विकण्यात आला आहे. उरलेला कचरा क्षेपणभूमीवरच पडला आहे. यामुळे डांबरीकरणासाठी प्लास्टीक दाणे बनविण्याची घोषणा खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने राबविलेल्या एक दिवसीय अभियानामध्ये २४ टन प्लास्टीक कचरा जमा झाला होता. वास्तविक शहरामध्ये रोज ६० ते ८० टन प्लास्टीक कचरा तयार होत आहे. यामुळे पालिकेने विशेष अभियान राबवूनही सर्व कचरा संकलित करता आलेला नाही. एक दिवसाचे अभियान झाल्यानंतर पुन्हा प्लास्टीक संकलित कसे करायचे याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. शहरात अनेक ठिकाणी प्लास्टीकमुक्तीचे फलक लावले आहेत. पण नियम धाब्यावर बसवून कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मॉल व इतर दुकानदारांनीही प्लास्टीक पिशव्या मोफत देणे बंद करणे आवश्यक आहे. एकूणच प्लास्टीकला पर्यायी पिशव्या उपलब्ध नसल्याने हे अभियान फसले आहे. विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष प्लास्टीकचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके वगळता एकही विभाग अधिकारी प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत नाही. तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रातील एपीएमसी मार्केट, मॅफ्को, तुर्भे जनता मार्केट, तुर्भे नाका परिसरात नवी मुंबईतील सर्वात जास्त प्रतिबंधात्मक प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असून तेथील विभाग अधिकारी अंगाई साळुंखे कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जो पर्यंत नियमीतपणे कडक कारवाई होणार नाही तो पर्यंत प्लास्टीक मुक्ती शक्य नसल्याचे बोलले जात आहे. >प्लास्टीक दाण्याची फक्त घोषणाप्लास्टीकमुक्त अभियान राबविताना जमा होणाऱ्या कचऱ्यापासून डांबरीकरणासाठी आवश्यक प्लास्टीक दाणे तयार केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात अशाप्रकारे प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प महापालिकेच्या क्षेपणभूमीवर नाही. यामुळे जमा झालेला कचऱ्यापैकी अर्धा कचरा पनवेलमध्ये नवीन सुरू होत असलेल्या कारखान्याला विकला आहे. पालिकेची ही योजनाही घोषणाबाजीच ठरली आहे. >प्लास्टीकमुक्तीसाठी हव्यात या उपाययोजना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर हवी रोज कारवाई मोफत प्लास्टीक पिशवी देणाऱ्या व्यावसायिकांवर हवी कारवाई कमी जाडीच्या पिशव्या विकणाऱ्या होलसेल दुकानांवर कारवाईची गरज शहरातील प्लास्टीकचा कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा हवीप्लास्टीक पिशव्यांना पर्यायी कागदी व इतर पिशव्यांची उपलब्धता आवश्यक व्यापाऱ्यांची बैठक घेवून त्यांना प्लास्टीकमुक्तीसाठी आवाहन करावेनागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून प्लास्टीक कमीत कमी वापरावे