ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ३० - महाराष्ट्राला २०१२ मध्ये लोडशेडिंगमुक्त करु असे खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांचे आता जनतेनेच 'बारा' वाजवायला हवेत असे विधान भाजपप्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. सत्ताधा-यांनी महाराष्ट्राला कर्जबाजारी केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
कोल्हापूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेत सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रासाठी तीन लाख कोटींचे कर्ज घेऊन राज्यात धरण, रस्ते, वीज याची कामे का होऊ शकली नाहीत असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. विकासकामांचा पैसा हा सत्ताधा-यांच्या खिशात गेला असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला. शेतक-यांच्या डोळ्यात पाणी असले तरी त्यांच्या जमिनीसाठी पाणी उपलब्ध नाही असे सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.