शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी नाट्यप्रेमी एकत्र

By admin | Published: July 03, 2017 7:58 PM

नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 3 - शहरातील नाट्यगृहांची दुरवस्था याविषयी लिहून आणि बोलून अनेक वर्षे उलटली तरी मनपा कधी याबद्दल गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. एवढ्या वर्षांची निष्क्रियता पाहूनही निराश न होता पुन्हा एकदा प्रशासनासमोर नाट्यगृहांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शहरातील नाट्यक्षेत्रातील कलावंत आणि नाट्यरसिक रविवारी एकत्र आले. संत एकनाथ रंगमंदिर येथे रविवारी (दि.२) नाट्यप्रेमींच्या झालेल्या बैठकीत मनपांतर्गत येणाऱ्या दोन्ही नाट्यगृहांची बिकट अवस्था समोर आणून त्यांची सुधारणा करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा करण्यात आली. मनपा चालवीत असलेल्या संत तुकाराम नाट्यगृह आणि संत एकनाथ रंगमंदिर या दोन नाट्यगृहांमध्ये सुविधांचा अभाव आहे. वेळोवेळी मनपाला याबाबत सांगूनही काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. अस्वच्छता, तुटलेल्या खुर्च्या, मोडका रंगमंच, असुविधाजनक ग्रीन रूम, स्वच्छतागृहांची दुरवस्था, जुनी ध्वनियंत्रणा व प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अशा अनेक समस्यांनी शहरातील या नाट्यगृहांना ग्रासलेले आहे. शाळा- कॉलेजच्या गॅदरिंगसाठी सूट देऊन नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थी खुर्च्यांवर उभे राहून नाचतात, त्यामुळे खुर्च्या तुटतात. याची भरपाईदेखील दिली जात नाही. यावर कुठे तरी नियंत्रण राहिले पाहिजे, अशी मागणी नाट्यप्रेमींनी केली आहे.लवकरच मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आणि विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना याबाबत निवेदन देऊन प्रत्यक्ष परिस्थिती दाखविण्यात येणार आहे. नाट्यगृहांचे हाल पाहून अनेक व्यावसायिक नाटक कंपन्या व कलावंत शहरात प्रयोग करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे स्थानिक रसिक दर्जेदार कलाकृती पाहण्यापासून मुकतात. कला-संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेल्या आपल्या शहराची ही ओळख आता ओसरू लागल्याची खंत नाट्यकर्मींनी व्यक्त केली. यावेळी शीतल रुद्रवार, सचिन नेवपूरकर, संदीप सोनार, राजू परदेशी, पवन गायकवाड, विशाखा रूपल, प्रसाद साडेकर, राजेंद्र जोशी, हेमंत अष्टपुत्रे, सारंग टाकळकर, माया गोस्वामी आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्यक्ष अभिनेत्यांनी केली होती तक्रार...रंगभूमीची अशी वाताहत झालेली पाहून अनेक कलावंतांनी आवर्जून येथील अनास्थेविषयी भाष्य केले होते. मागच्या वर्षी तर प्रशांत दामले यांनी स्वत: प्रयोगापूर्वी नाट्यगृहात झाडूने सफाई केली होती. सुयश टिळकने नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. याबरोबरच जितेंद्र जोशी, सौरभ गोखले, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनी येथे आल्यावर नाट्यगृहांच्या दुरवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे.जीएसटीमुळे नाटकाचे तिकीट दर वाढलेवस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) नाटकांच्या तिकिटावर आता १८ टक्के कर लागणार आहे. म्हणजे ३०० रुपयांच्या तिकिटावर ५४ रुपये कर बसेल. म्हणजे तिकीट होणार ३५४ रुपये. जीएसटी लागू झाल्यामुळे नाट्यरसिकांच्या खिशाला थोडाफार भार सोसावा लागणार आहे. महागडे तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांना जेव्हा त्या बदल्यात सुविधा मिळत नसतील तर ते पुन्हा येणे पसंत करणार नाहीत.