ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - दहीहंडी उत्सवात २० फूट उंचीचा नियम पाळू नका असं गोविंदा पथकं आणि आयोजकांना आवाहन करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी राज यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
येत्या २० सप्टेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालायने दहीहंडीच्या उंचीवर २० फुटाचा निर्बंध घातल्यानंतर राज यांनी पत्रकारपरिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी गोविंदा मंडळ आणि आयोजकांना नियम न पाळण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार ठाण्यात नौपाडामध्ये मनसेने चाळीस फुटाची हंडी बांधली. जोगेश्वरीतल्या जयजवान गोविंदा पथकाने येथे नऊ थरांची सलामी दिली. मुंबईत गल्लोगल्ली दहीहंडीच्या उंचीच्या आणि बालगोविंदांच्या सहभागाच्या नियमांचे उल्लंघन झाले. आता कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी राज यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे.