पुणे :महिलांना पुरुषांच्याप्रमाणे समानतेचा अधिक असून त्यांनाही मस्जिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील मुस्लिम जोडप्याने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यास्मिन झुबेर अहमद पिरजादे आणि त्यांचे पती झुबेर अहमद नाझीर अहमद पिरजादे या दोघांनी अशी याचिकाकर्त्यांनी नावे आहेत.
या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की,"कुरान आणि हदीसमध्ये कुठल्याही प्रकारचा लैंगिक फरक सांगितलेला नाही. त्यामुळे मशिदीमध्ये प्रवेश करण्यापासून महिलांना मनाई करणे ही निंदनीय आणि असंवैधानिक आहे. अशा प्रथा केवळ स्त्रीच्या मूलभूत प्रतिष्ठेसाठीच प्रतिकूल नाहीत'' असे म्हटले आहे. त्यांची ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. शबरीमला प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार न्यायालयाने याचिका स्वीकारली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार केंद्र सरकार, वक्फ बोर्ड आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत लोकमतशी बोलताना म्हणाले की,जो धर्म समानता सांगतो तो महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. पैगंबर साहेबांनी महिलांना मस्जिदमध्ये येण्यास परवानगी दिलेली आहे. आम्ही घराजवळील मस्जिदमध्ये महिलेला प्रवेश मिळावा म्हणून परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली.आम्ही पोलिसांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला होता. अखेर आम्ही हदीसच्या आधारावर कोर्टाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यात महिलांना मस्जिदीमध्ये पाचवेळा नमाज पढण्याची परवानगी आहे. मस्जिद ट्रस्टींनी त्यांच्या येण्याजाण्याचा मार्ग आणि बसण्याच्या व्यवस्थेची सोय करावी.