ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या चप्पल मारहाणीच्या घटनेबाबात खेद व्यक्त केला आहे. सोबत एअरलाइन्सकडून त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदीही हटवण्याची विनंती केली आहे. दरम्यान एअर इंडियाकडून अद्यापही गायकवाड यांच्यावर बंदी कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गायकवाड यांनी अशोक गजपति राजू यांनी लिहिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, 23 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेवर खेद व्यक्त करतो. घडलेला प्रकार हा जाणूनबुजून करण्यात आलेला नव्हता, की ज्यामुळे परिस्थितीत बिघाड होईल. शिवाय, झालेल्या घटनेला कोण जबाबादार हे संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल. मात्र, या घटनेच्या उदाहरणावरुन भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, हेदेखील निश्चित केले पाहिजे.
एअललाईन्सकडून लावण्यात आलेल्या बंदीमुळे आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडू शकत नसल्याचंही गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर विमान प्रवेशबंदी हटवण्यासाठी त्यांनी अशोक गजपति राजू यांना विनंती केली आहे.
तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत गायकवाड कर्मचा-यांची बिनशर्त माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील विमान प्रवेश बंदी हटवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Must not let R Gaikwad onboard unless he tenders unconditional apology to AI employees & undertakes in writing to abide by all norms: AICCA— ANI (@ANI_news) April 7, 2017
Shiv Sena MP Ravindra Gaikwad conveys regret to Civil Aviation Min Ashok Gajapathi Raju, requests to lift fly ban imposed on him pic.twitter.com/L933Cn2HKq— ANI (@ANI_news) April 6, 2017